आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंजुरी:17 पशुचिकित्सालयांच्या निर्लेखनाला मंजुरी ; अधिकाऱ्याने समर्पित केलेला निधी सभापतींच्या प्रयत्नांनी मिळाला

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अधिकाऱ्याने समर्पित केलेला निधी सभापतींच्या प्रयत्नांनी मिळाला, पाच जिल्हा परिषदेच्या जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी पशुचिकित्सालयांचे निर्लेखन प्रस्तावांच्या मंजुरीची वाट न पाहता, बांधकामासाठी असलेला दोन कोटी ५५ लाख रुपयांचा निधी समर्पित केला होता. तो निधी कृषी आणि पशुसंवर्धन सभापती संग्राम पाटील यांनी परत मिळवला. त्यातून पाच दवाखान्यांच्या कामाला मंजुरी मिळाली. या शिवाय १७ पशुचिकित्सालयांच्या निर्लेखन प्रस्तावदेखील मंजूर केले. मात्र दुर्दैवाने पशुसंवर्धन विभागाने २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी निधीची मागणीच केलेली नसल्यामुळे या विभागाला निधी मिळाला नाही. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने आदिवासी क्षेत्रातील ८५ लाख आणि सर्वसाधारण क्षेत्रातील एक कोटी ४० लाख असे दोन कोटी ५५ लाख रुपयांचा बांधकामाचा निधी, जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. राजेंद्र लंघे यांनी डिसेंबर महिन्यात शासनाला समर्पित केला. जिल्ह्यात पशुचिकित्सालयांच्या इमारतींच्या निर्लेखनास मंजुरी नसल्यामुळे निधी परत केल्याचे कारण डॉ. लंघे यांनी पुढे केले. यामुळे स्थायी समिती, सर्वसाधारण सभेत जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांवर कारवाईचा ठरावदेखील करण्यात आला. दरम्यान निधी परत केल्याने होणारे नुकसान टाळण्यासाठी कृषी आणि पशुसंवर्धन सभापती संग्राम पाटील यांनी स्वत: समर्पित निधी परत आणण्यासाठी प्रयत्न केले. मोठ्या प्रयत्नानंतर अडीच कोटी रुपयांचा निधी जिल्हा नियोजन मधून जिल्हा परिषदेला परत मिळाला. या निधीतून जिल्ह्यात पाच पशुचिकित्सालयांचे बांधकाम होणार आहे. त्यात शिरपूर तालुक्यातील सांगवी, तऱ्हाडी, झेंडेअंजन तर धुळे तालुक्यात शिरुड, शिंदखेडा तालुक्यात धमाणे येथे नवीन पशुचिकित्सालय इमारत बांधकाम हाेणार आहे. याकरिता प्रत्येकी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी पाठपुरावा ^जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी दवाखान्यांच्या निर्लेखन प्रस्ताव नसल्याने निधी परत केले होते. यामुळे आधी १७ दवाखान्यांच्या निर्लेखन प्रस्ताव मंजुरीसाठी प्रयत्न केले. त्याला यश देखील आले. त्यानंतर समर्पित केलेला निधी देखील परत आणण्यात यश आले. त्यातून आता पाच दवाखान्यांचे काम होणार आहे. ज्यांनी निधी समर्पित केला. त्यांनी नव्याने निधीची मागणी केली नाही, त्या अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी देखील पाठपुरावा सुरू आहे. त्यांचे निलंबन होत नाही तोपर्यंत पाठपुरावा सुरू ठेवण्यात येईल. संग्राम पाटील, कृषी आणि पशुसंवर्धन सभापती,जिल्हा परिषद

बातम्या आणखी आहेत...