आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीपुरवठ्याची समस्या:पाणी, गटार योजनेच्या उर्वरित कामाला मान्यता

धुळे14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाणीपुरवठा व भूमिगत गटार योजनेच्या उर्वरित कामाला शासनाने मान्यता दिली आहे. आता पुढील टप्प्यात ज्या भागात पाणीपुरवठ्याची समस्या आहे त्या भागात जलवाहिनी टाकली जाईल. तसेच जीर्ण जलवाहिन्या बदलल्या जातील. हद्दवाढीच्या भागात आवश्यक तेथे जलकुंभ उभारले जातील. तसेच नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारणे, जुन्या केंद्राचे नूतनीकरण करणे आदी कामे करण्यास मंजुरी मिळाली आहे.

हे काम मार्गी लागावे यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे खासदार डॉ. सुभाष भामरे, माजी मंत्री गिरीश महाजन, आमदार जयकुमार रावल, अमरीश पटेल, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, महापौर प्रदीप कर्पे, भाजपाचे महानगराध्यक्ष अनुप अग्रवाल आदींनी प्रयत्न केले.

बातम्या आणखी आहेत...