आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशेकडो वारकरी दरवर्षी पायी विठ्ठल दर्शनाला जातात, वारीचा हा समृद्ध वारसा परिवर्तन नाट्य संस्थेच्या टीमने ‘पालखी’ या संगीतमय वारीच्या माध्यमातून मांडले, मंत्रमुग्ध करणारे अभांग टाळ मृदुंगाच्या तालावर ऐकतांना रसिक प्रेक्षक तल्लीन झाले. शहरातील राजर्षी शाहू नाट्यगृहात यंग फाऊंडेशन आयोजित स्व. यादव खैरनार स्मृती परिवर्तन नाट्य महोत्सव सुरु आहे. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी महाराष्ट्रातील संत वारकरी परंपरेची अनुभुती देणारा वारीचा सांगीतीक ‘पालखी’ हा कार्यक्रम जळगावच्या परिवर्तनच्या कलावंतानी सादर केला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून देऊळ, वळू, विहीर, हायवे अशा दर्जेदार व गाजलेल्या मराठी चित्रपटांचे दिग्दर्शक उमेश कुलकर्णीं, विद्यावर्धिनी संस्थेचे चेअरमन अक्षय छाजेड, सचिन सिंघवी, सार्थक कुर्डेकर उपस्थित होते. धुळे हे सांस्कृतिक वारसा लाभलेले शहर आहे. कला ही माणसांच जीवन सुंदर करते, म्हणून प्रत्येकाने कला जोपासावी, कलांना विसरता येणार नाही, कला माणसाचं जगणं समृद्ध करत असतात, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत वारीचे मोठे योगदान आहे, ती संस्कृती परिवर्तन संस्थेच्या टीमने प्रत्यक्षात मांडली असे मत दिग्दर्शक अतुल कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
या नंतर परिवर्तनच्या टीमने दि. बा. मोकाशी यांच्या पालखी या पुस्तकाचे शंभू पाटील यांनी केलेल्या नाट्यरूपांतर मांडले. मोकाशी यांनी जेव्हा त्यांनी वारीचा शोध घ्यायचे ठरवले त्यावेळी वारी म्हणजे काय, वारीत वेगवेगळ्या प्रातांतील लोक जेव्हा एकत्रितपणे सहभागी होतात, त्यातील लोकांचे अनुभव, प्रसंग, घडामोडी याविषयी त्यांनी सविस्तर पद्धतीने वर्णन मांडले आहे. परिवर्तनच्या टिमने या नाट्यरूंपातरीत केलेल्या संगीतमय कार्यक्रम दरम्यान आपल्या कसदार अभिनयातून, संगितातून वेगवेगळ्या पद्धतीने दर्जेदारपणे सादरीकरण केले आहे.
आज ‘रेगिस्थान से हिंदुस्थान’ तक
महोत्सवाचा समारोप रविवारी गजल ‘रेगिस्थान से हिंदुस्थान’ तक या गजलेच्या एकूण प्रवासाविषयीचा सांगीतिक कार्यक्रमाने होणार आहे. या कार्यक्रमाची संकल्पना शायर डॉ.दिलीप पांढरपट्टे यांची आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.