आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून अक्कलपाडा प्रकल्पातून पांझरा नदीपात्रात पाणी साेडण्यात आले होते. त्यामुळे नदी दुथडी भरून वाहत होती. परिणामी पाण्याबराेबर माेठ्या प्रमाणावर वाळूही नदीपात्रात वाहून आली. दाेन दिवसांपासून नदीपात्रातील पाण्याची पातळी कमी झाली आहे. ही संधी साधत काहींनी नदी पात्रातून अवैध वाळू उपसा सुरू केला आहे. काहींनी नदीच्या काठावर वाळू काढून जमा करून ठेवली आहे.
साक्री तालुक्यात व अक्कलपाडा धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाला. त्यामुळे अक्कलपाडा प्रकल्पात माेठ्या प्रमाणावर जलसाठा निर्माण झाल्याने प्रकल्पातून पांझरा नदीपात्रात पाणी साेडले होते. यापूर्वी मे महिन्यात अक्कलपाडा धरणातून आरक्षित पाण्याचे आवर्तन साेडले गेले हाेते. त्यामुळे नदीपात्रात पाण्याबराेबरच वाळूही वाहून आली. परिणामी नदीपात्रात वाळूचा मुबलक साठा जमा झालेला आहे. माेराणेपासून पुढे वरखेडी केटिवेअर पर्यंत पांझरा नदीचे पात्र शहरात येते. शहरात नदीपात्रात अनेकांकडून अवैधरीत्या वाळू चाेरी केली जाते आहे. याविषयाकडे लक्ष गरज आहे.
अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष
नदीपात्रातून खुलेआम सुरू असलेल्या वाळूचाेरी विरोधात महसूल यंत्रणेकडून कारवाई केली जात नाही. महसूल अधिकारी नदीवरील पुलावरून जातात. ते वाळू चोरीचा प्रकार पाहतात. त्यानंतरही कारवाई करण्यासाठी पुढे येत नाही. त्यामुळे नाराजी व्यक्त होते आहे.
येथून होते वाळूची वाहतूक
नदीतील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर शहरातील नकाणे राेड, गणपती पूल, एकवीरा देवी मंदिराच्या समाेर व पुढे महामार्गाजवळील पुलाजवळ, कुमार नगर पूल आदी भागात अवैधरीत्या वाळू उपसा केला जातो आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.