आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गैरसोय:बसेस मुंबईला गेल्याने ऐन दसऱ्याच्या दिवशी प्रवासी तासनतास ताटकळले बसस्थानकात

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई येथे होणाऱ्या दसऱ्या मेळाव्याला धुळे विभागातून मोठ्या प्रमाणात बसेस सोडण्यात आल्या आहेत. यामुळे स्थानिक यंत्रणेला कसरत करावी लागत आहे. दसऱ्याच्या दिवशी प्रवाशांची गर्दी कमी होती. मात्र असे असले तरी बसेसच्या प्रतीक्षेत प्रवाशांना तासन‌्तास ताटकळत उभे राहावे लागले. आज नियमित शाळा, महाविद्यालये सुरू राहणार आहेत. यामुळे आज विद्यार्थी वाहतूक विस्कळीत होणार नाही, या दृष्टीने एसटी महामंडळ प्रशासनाला कसरत करावी लागणार आहे.

मुंबई येथील दसरा मेळाव्यासाठी धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातून शिवसेना आणि शिंदे सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुंबईत गेले आहेत. याकरिता १७१ बसेस बुक करण्यात आल्या होत्या. या पैकी प्रत्यक्षात १५१ बसेस रवाना झाल्या आहेत. त्यात विभागातील सर्वात मोठे आगार असलेल्या धुळे आगारातून २० बसेस रवाना झाल्या आहेत. एकाच वेळेस एवढ्या मोठ्या प्रमाणात बसेस सोडण्यात आल्याने नियमित प्रवासी फेऱ्यांवर परिणाम झालेला दिसून आला. यामुळे प्रवाशांचेही हाल झाले.

आज मुंबईहून बसेस येणार; पण नियोजनासाठी होणार कसरत
गुरुवारी सायंकाळपर्यंत मुंबईला गेलेल्या बसेस परत येतील. तसेच शाळा, महाविद्यालये सुरू राहणार आहेत. तर शासकीय कार्यालयेही सुरू राहणार आहेत. यामुळे आहेत, त्या बसेसच्या माध्यमातून नियोजन करताना एसटी महामंडळ प्रशासनाची तारांबळ उडणार आहे. तर विद्यार्थी, नोकरदार व प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एसटी महामंडळ कसे नियोजन करते, याकडे लक्ष आहे.

प्रवाशांची गैरसोय होणार नाही
धुळे आगारातून २० बसेस मुंबईला सोडण्यात आल्या आहेत. बुधवारी प्रवाशांची गर्दी कमी होती. यामुळे फारशा अडचणी आल्या नाहीत. गुरुवारीदेखील त्या पद्धतीने प्रवाशांची गैरसोय होणार नाही, याची खबरदारी घेण्यात येणार आहे. तसेच ज्या मार्गावर जादा प्रवासी आहेत. त्या मार्गावर बस सोडण्यात येतील. मात्र कोणत्याच परिस्थितीत शालेय फेऱ्या रद्द होणार नाहीत. अनुजा दुसाने, आगारप्रमुख, धुळे

बातम्या आणखी आहेत...