आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात नवीन शैक्षणिक धोरण २०२० ची अंमलबजावणी टप्प्याटप्प्यात सुरू झाली आहे. त्यानुसार नॅशनल स्किल क्वॉलिफिकेशन फ्रेमवर्कनुसार नववी आणि दहावीचे विद्यार्थी व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाची निवड करू शकतात. तसेच आगामी काळात सहावीपासून विद्यार्थ्यांना व्यवसाय शिक्षणाचा अभ्यासक्रम निवडता येईल.
तसेच आता प्रत्येक सत्रानुसार पुस्तकातच प्रश्नोत्तर सोडवण्यासाठी वही असेल. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे हलके होण्यास मदत होणार आहे. विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण देण्यामागे कुशल कामगार निर्माण करणे हा मुख्य उद्देश आहे.
त्यामुळे नववी व दहावीला पाच व्यावसायिक शिक्षण अभ्यासक्रम असतील. नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यासाठी पावले उचलली जात आहे. सध्या नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी, कृषी, गृहविज्ञान, ऊर्जा आणि पर्यावरण हे विषय आहे. याविषयांची ७० गुणांची प्रात्यक्षिक आणि ३० गुणांची लेखी परीक्षा असेल. तसेच प्रत्येक विषयाचे किमान तीन पुस्तक असतील. प्रथम चाचणीचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर त्यावर आधारित प्रश्नोत्तरे सोडवण्यासाठी वह्याप्रमाणे काही कोरी पान पुस्तकात असतील. हा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर पुढच्या सत्रात आधीप्रमाणे नवे पुस्तक मिळेल.
अभ्यासक्रम ठरवण्याची तयारी
सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या अभ्यासक्रमाची संकल्पना काय असेल, कोणते विषय असतील? याबाबत निर्णय झाला नसला तरी विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण कसे मिळेल याचा विचार होईल. राज्यातील ५० टक्के विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाशी जोडण्याचे उद्दिष्ट लक्षात घेऊन धोरण राबवले जाणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.