आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:पथदिवे बंद असल्याने पांझराकाठावर अंधाराचे साम्राज्य

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील पांझराकाठावर दाेन्ही बाजूला नव्याने रस्ते तयार करण्यात आले आहे.मात्र एकवीरा देवी मंदिर ते हत्तीडाेह या मार्गावरील अनेक पथदिवे बंद स्थितीत आहे. यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.पालिकेने याकडे लक्ष देऊन पथदिवे सुरू करावेत, अशी मागणी आहे.नवरात्र, गणेशाेत्सवाच्या काळात ते सुरू करण्यात आले हाेते. मात्र जेमतेम महिनाभर ते सुरू हाेते. त्यानंतर ते पुन्हा बंद पडले आहे. या मार्गाचा वापर अनेक वाहनधारकांकडून केला जाताे. पावसामुळे रस्त्यावर खड्डेही पडलेले आहे.

त्यात रात्रीच्या वेळेस पथदिवे बंद राहत असल्याने संपूर्ण रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य असते. त्यामुळे अपघात व अन्य अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी संबंधितांनी याकडे लक्ष देऊन तातडीने या मार्गावरील पथदिव्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी परिसरातील काॅलनी भागात राहणाऱ्या नागरिकांकडून करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...