आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंजुरी‎:औषधाबाबत निर्णय नसल्याने‎ आरोग्यवर्धिनीतून सेवा बंदच‎

धुळे‎22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनपा क्षेत्रात १६ आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू‎ करण्यास मंजुरी मिळाली आहे. केंद्र सुरू‎ करण्यासाठी मनपाने जागा दिली असून‎ १३ डॉक्टरांचीही नियुक्ती झाली आहे. पण‎ आरोग्य केंद्रात येणाऱ्या रूग्णांना औषधे‎ मोफत द्यावी का सशुल्क हे स्पष्ट‎ नसल्याने आरोग्यवर्धिनी केंद्रातून अद्याप‎ सेवा सुरू झालेली नाही.‎ महापालिकेच्या शहरातील‎ दवाखान्यातून नाममात्र शुल्कात सेवा‎ दिली जाते.

तसेच विविध प्रकारची‎ औषध मोफत दिली जातात. तसेच‎ एनयुएचएम योजनेतून सुरू झालेल्या‎ दवाखान्यातूनही आरोग्य सेवा दिली‎ जाते. दुसरीकडे आता केंद्र शासनाने १६‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू करण्यास मंजुरी‎ दिली आहे. मनपा हद्दवाढीत असलेल्या‎ गावातील नागरिकांना चांगली आरोग्य‎ सुविधा मिळावी या उद्देशाने हा निर्णय‎ झाला आहे. आरोग्य केंद्रासाठी साहित्य‎ व फर्निचर जिल्हा परिषदेच्या आरोग्य‎ विभागाकडून देण्यात येते आहे.‎

तर ताण होईल कमी‎
ज्या भागात दवाखाने नाही त्या भागात‎ आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू करण्याचे निर्देश‎ होते. त्यानुसार हे केंद्र सुरू करण्याचे‎ ठरले. या केंद्रासाठी डॉक्टरही उशीरा‎ उपलब्ध झाले. केंद्र सुरू झाल्यावर‎ महापालिकेच्या दवाखान्यावरील ताण‎ कमी होणार आहे.‎

बातम्या आणखी आहेत...