आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या दीड वर्षापासून प्रलंबित कॉलेज रस्त्याचे डांबरीकरण, फुटपाथ, गटारी बांधकाम त्वरीत सुरू करण्यात यावे, अशी मागणी तळोदा शहर राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. या संदर्भात मुख्याधिकारी सपना वसावा यांना निवेदन देण्यात आले. कॉलेज रस्त्याचे डांबरीकरण, फुटपाथ गटारी बांधकामाबाबत निधी २३८०२७८७ इतका मंजूर असून ३०/६/२०२१ दरम्यान कार्यारंभ आदेश मिळून दीड वर्ष उलटून देखील काम पूर्ण झालेले नाही. तसेच संबंधित ठेकेदाराला या कामाचे ८५% रक्कम अ दा करण्यात आली आहे. या बाबत राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदन देताना राष्ट्रवादी शहराध्यक्ष योगेश मराठे, शहर उपाध्यक्ष गणेश पाडवी, अनिल पवार, नदीम बागवान, सहसंघटक मुकेश पाडवी, युवक शहर उपाध्यक्ष देवेश मगरे, नितीन मराठे, शोएब पठाण यांसह पदाधिकारी उपस्थित तळोदा पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी.
विद्युत खांब हलवल्यानंतर जलदगतीने काम रस्त्यावर विद्युत खांब असल्याने ते काढण्यासाठी विद्युत वितरण कंपनीजवळ समन्वय साधून विद्युत खांब हलवण्यासाठी हालचाली सुरू होत्या. दरम्यान लवकरच विद्युत खांब बाजूला झाल्यावर डांबरीकरण व इतर अपूर्ण कामे जलदगतीने पूर्ण करण्यात येतील. अनिल जावरे, ठेकेदार
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.