आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राणघातक हल्ला:प्राणघातक हल्ला, दुसऱ्या गटाच्या तरुणावरही वार; तिघांविरुध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

धुळे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील साक्री रोड परिसरात झालेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणी दुसऱ्या गटानेही तक्रार दिली आहे. या तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी तिघांविरुध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

मनपात कंत्राटी कर्मचारी असलेल्या लाल्या उर्फे विवेक मोरे याने रोहित अशोक चौधरी याच्या विरोधात तक्रार दिली होती. त्यावरुन प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी आता रोहित चौधरी यानेही तक्रार दिली आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहे.

त्याच्या तक्रारीनुसार लाल्या, वण्या व भय्या यांनी शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केली. तसेच जीव मारण्याची धमकी देत रोहितच्या हाताच्या पंजावर चाकूने वार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...