आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेवृत्त:व्यापाऱ्याच्या मुलावर प्राणघातक हल्ला; दोन्ही संशयितांना अटक

शिरपूर17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दुकानावरील गिऱ्हाईक आल्याच्या कारणावरून एका व्यापाऱ्याच्या मुलावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. शिरपूर पोलिसांनी लागलीच दोघे मारेकऱ्यांना ताब्यात घेतले.

१३ रोजी दुपारच्या सुमारास कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील धन्ना ट्रेडर्स या दुकानासमोर ही घटना घडली. धन्ना ट्रेडर्सचे मालक विजयकुमार गुलाबचंद जैन (६५, रा. दादा गणपती शिरपूर) हे दुकानावर असताना त्यांच्या दुकानावर संशयित आरोपितांचे दुकानावरील गिऱ्हाईक आल्याच्या संशयावरून हाणामारीची घटना घडली. संशयित आरोपी नंदकिशोर आबा देवरे (४०, रा. शिरपूर) यांनी त्यांच्या दुकानाच्या काउंटरवर चढून काउंटरवर असलेल्या पोत्यातून धान्य काढण्याचा लोखंडी टोकदार बंब काढून जैन यांचा मुलगा नवनीत जैन याच्यावर हल्ला केला. त्यात नवनीत याच्या पोटात टोकदार बंब खुपसून त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...