आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ध्वजारोहण:तळोदा येथील संपर्क कार्यालयात ; तळोदा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे वर्धापनदिनानिमित्त झाले ध्वजारोहण

तळोदा24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

१० जून या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २३ व्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाच्या येथील कार्यालयात प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या सूचनेप्रमाणे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार उदेसिंग पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला. शहराध्यक्ष योगेश मराठे यांच्या हस्ते ध्वजपूजन व उत्तर महाराष्ट्र विभागीय महिला अध्यक्षा तथा नगरसेविका अनिता परदेशी यांच्या हस्ते १० वाजून १० मिनिटांनी ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत म्हणत वर्धापन दिन साजरा झाला.

या वर्धापन दिन कार्यक्रमाला पक्षाचे ओबीसी सेल प्रदेश सरचिटणीस एन.डी.पाटील, डॉक्टर सेलचे प्रदेश सरचिटणीस डॉ.तुषार संनसे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष कमलेश चौधरी, अल्पसंख्याकचे माजी जिल्हाध्यक्ष जाकीर मिया जागीरदार, सरकार सेल जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम चव्हाण, बांधकाम सभापती हितेंद्र क्षत्रिय, क्षेत्रीय युवक नेते संदीप परदेशी, नगरसेवक भास्कर मराठे, तालुकाध्यक्ष डॉ.पुंडलिक राजपूत, शहराध्यक्ष योगेश मराठे, युवक तालुकाध्यक्ष कमलेश पाडवी, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष आरिफ शेख नुरा, शहराध्यक्ष आदिल शेख, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.रामराव आघाडे, डॉ.लक्ष्मीकांत गिरनार, केसरसिंग क्षत्रिय, प्रल्हाद फोके, याकूब सर, मुश्ताक अली कालू मिया, सोमनाथ टेलर, महिला जिल्हा समन्वयक सीमा सोनगिरे, शीला मराठे, शोभा पाटील, गायत्री क्षत्रिय, सोनाली चव्हाण, पुष्पा गावीत, अनिल पवार, कैलास पाडवी, राहुल पाडवी, गणेश राणे, हितेश चौधरी, कुणाल पाडवी, नदीम बागवान, सोनू सोनवणे, मुकेश पाडवी, गणेश पाडवी, धर्मराज पवार, नितीन मिस्त्री, प्रकाश पाडवी, दीपक पाडवी, देवेश मगरे, आदित्य पिंपळे, शिवम शेंडे, किसन शिरसाट, नितीन वाघ, हितेश राणे, इंद्रजीत, आकाश शिंपी, नासिर शेख, कुशन वळवी, शामराव वळवी, रोहिदास पाडवी, रतिलाल वळवी, संदीप वळवी, इम्रान शिकलीकर, विकास खाटीक व जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...