आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील आर. सी. पटेल माध्यमिक विद्यालयात अटल टिंकरिंग लॅबमध्ये विद्यार्थ्यांसाठी अटल समर कॅम्प सुरू झाला आहे. विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला चालना मिळावी या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येतो आहे. प्राचार्य पी. व्ही पाटील, एच. आर. पटेल कन्या माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य आर. बी. पाटील उपस्थित होते. विद्यार्थ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स, बेसिक इलेक्ट्रॉनिक आणि सर्किट डिझाइन, थ्रीडी प्रिंटिंग, व्हर्च्युअल रिअॅलिटी, एनआरसी रोबोटिक्स आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. आविष्कार इन्फोटेक कंपनीचे प्रशिक्षित ट्रेनर मार्गदर्शन करतील. तसेच विद्यार्थ्यांना विविध उपकरणे बनवण्यासाठी आवश्यक असणारी किट अटल टिंकरिंग लॅब मार्फत पुरवली जाणार आहेत.
या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान व संशोधनाची आवड निर्माण होऊन नवनिर्मितीला चालना मिळेल. एच. आर. पटेल व आर. सी. पटेल विद्यालयाच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी शिबिरात सहभागी झाल्या आहे. शिबिराच्या यशस्वितेसाठी पर्यवेक्षक एन. ई. चौधरी, विज्ञान शिक्षक व्ही. डी. पाटील, पी. एस. परदेशी, पी. के. पाटील, जी.के. सोनवणे, पी. बी. वाघ, आर. जे. पाटील यांचे सहकार्य लाभते आहे. सीईओ डॉ. उमेश शर्मा, प्राचार्य पी. व्ही. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होतो आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.