आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:जिम मालकाला ठार करण्याचा प्रयत्न ; देवपूर पोलिस ठाण्यात मध्यरात्री गुन्हा दाखल

धुळे23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवपुरातील जिममध्ये प्रतीक गिते नामक तरुणाला दमदाटी झाली. याबाबत तरुणाने एका पान टपरीजवळ जात संबंधितांना जाब विचारला असता तरुणाच्या डोक्यात दगड टाकून ठार मारण्याचा प्रयत्न झाला. याप्रकरणी पाच जणांवर देवपूर पोलिस ठाण्यात मध्यरात्री गुन्हा दाखल झाला. देवपुरातील क्षीरे कॉलनीत राहणाऱ्या प्रतीक भगवान गिते (वय ३४ ) या तरुणाने याबाबत तक्रार दिली आहे. त्यानुसार जिममध्ये स्वच्छता करत असताना सिद्धेश रवींद्र काकडे, ललित दिलीप राठोड, सौरभ प्रवीण नागरे, कुणाल चुडामण महाले, प्रणव इंदल पाटील यांनी वाद घातला. तसेच शिवीगाळ केली. त्यानंतर संशयित देवपुरातील दिलबहार पान सेंटर जवळ उभे असताना त्यांना प्रतीकने जाब विचारला. या वेळी जमावाने प्रतीकला शिवीगाळ, दमदाटी व मारहाण केली. डोक्यात दगड मारून ठार मारण्याचा प्रयत्न केला. जखमी प्रतीक वर उपचार सुरू आहे.

तिघांची कोठडीत रवानगी या प्रकरणी पोलिसांनी ललित, सौरभ व कुणालला अटक केली. त्यांना मंगळवारी दुपारी न्यायालयात उभे केल्यावर तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली.

बातम्या आणखी आहेत...