आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोटारसायकल चोरीचा प्रयत्न:हिरे रुग्णालयात चोरीचा प्रयत्न, पाच दुचाकी जप्त ; मालेगावचे दोघे जेरबंद

धुळे17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिरे रुग्णालयाच्या आवारात मोटारसायकल चोरीचा प्रयत्न करणाऱ्या एकाला ताब्यात घेतल्यानंतर दुसऱ्याचे नाव समाेर आले. या प्रकरणी मालेगाव येथील दोघांना अटक करण्यात आली. पाच मोटारसायकली जप्त केल्या. हिरे रुग्णालयाच्या आवारात कर्मचाऱ्याची मोटारसायकल चोरीचा प्रयत्न झाला होता. महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांनी एकाला ताब्यात घेत शहर पोलिसांच्या स्वाधीन केले.

बबलू उर्फे अरबाज शेख रफिक (वय २४, रा. पवारवाडी ब्रिजजवळ, मालेगाव) असे त्याचे नाव आहे.चौकशी केल्यावर त्याने मोहंमद हुसेन जमील अहमद (वय २२,रा.बिस्मिल्ला बाग, मालेगाव) याचे नाव सांगितले. त्यामुळे मोहंमद हुसेनला अटक केली. त्याच्याकडून पाच मोटारसायकली जप्त झाल्या. पोलिस निरीक्षक नितीन देशमुख व त्यांच्या पथकातील अधिकारी दादासाहेब पाटील,कर्मचारी विलास भामरे, जगदीश पाटील, प्रल्हाद वाघ, गुणवंत पाटील, तुषार मोरे, अविनाश कराड, प्रसाद वाघ, सचिन पगारे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

करडी नजर : महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांची करडी नजर असल्याने अरबाज पोलिसांच्या हाती लागला. त्यामुळे पोलिसांनी सुरक्षा बलातील जवानांचा गौरव करणे आवश्यक आहे.

बातम्या आणखी आहेत...