आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:प्रभातनगरमध्ये चोरीचा प्रयत्न, एकाला अटक

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवपुरातील प्रभातनगरात झालेल्या चोरीच्या प्रयत्नाबद्दल पोलिसांनी एकाला अटक केली. सनी उर्फ हर्षल चौधरी असे त्याचे नाव आहे. त्याची पोलिस कोठडीत रवानगी झाली. याप्रकरणी देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. चार अज्ञात चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

प्रभातनगरातील मारुती मंदिराजवळ राहणारे मोहन रतन माळी यांच्या घराशेजारी असलेल्या महाजन एन्टरप्रायजेसचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न झाला होता. काही तरुणांना चोरीची चाहूल लागल्याने चोरट्यांनी पळ काढला होता. ही घटना २८ नाेव्हेंबरला घडली होती. पोलिसांनी या प्रकरणी हितेश मोहन महाजन (वय ३५) याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. पोलिस कर्मचारी राजेंद्र हिवरकर व सहकाऱ्यांनी या प्रकरणी सनी उर्फ हर्षल कैलास चौधरी (वय २१, रा. विटाभट्टी) याला अटक केली. अन्य तीन जणांच्या मदतीने त्याने चोरीचा प्रयत्न केल्याचा संशय आहे. सनीची कोठडीत रवानगी झाली.

मद्यपींना असावा चाप प्रभातनगरला लागून समांतर रस्त्यावर सायंकाळनंतर मद्यपी बसतात. त्यातून वाद व हाणामारी होते. त्यानंतर या भागात पोलिसांचे गस्तीपथक सायंकाळी येत नाही.

बातम्या आणखी आहेत...