आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:विद्यार्थी गळती रोखण्यासाठी उपस्थिती ध्वज उपक्रम; अभिनंदन फलकाने गुणांना वाव

धुळे21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे तालुक्यातील सरवड येथील जिल्हा परिषदेत शाळेत दोन महिन्यापासून उपस्थिती ध्वज संकल्पना राबवली जाते आहे. ज्या वर्गात सर्वाधिक विद्यार्थी हजर असतील त्या वर्गाच्या बाहेर दिवसभर ध्वज लावण्यात येतो. त्यामुळे विद्यार्थी रोज न चुकता शाळेत येतात.विद्यार्थ्यांची घटती पटसंख्या आणि गैरहजेरीचे प्रमाण कमी करण्यासाठी धुळे तालुक्यातील सरवड येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका मयूरी पाकळे यांनी मुख्याध्यापक विकास पाटील यांचे मार्गदर्शन आणि इतर शिक्षकांच्या सहकार्याने जुलै महिन्यापासून उपस्थिती ध्वज संकल्पना सुरू केली आहे.

या उपक्रमासाठी शिक्षिका मयूरी पाकळे यांनी ध्वज तयार केला. ज्या दिवशी ज्या वर्गात विद्यार्थ्यांची उपस्थिती अधिक त्या वर्गाला परिपाठानंतर मुख्याध्यापकांच्या हस्ते ध्वज बहाल करण्यात येतो. दिवसभर त्या वर्गाच्या बाहेर हा ध्वज लावला जातो. उपस्थिती ध्वज संकल्पना सुरू झाल्यापासून विद्यार्थ्यांमध्ये हा ध्वज आपल्या वर्गाला मिळावा यासाठी चढाओढ सुरू झाली आहे. जर एखादा विद्यार्थी गैरहजर असेल तर इतर विद्यार्थी गैरहजर विद्यार्थ्यांला शाळेत आणण्यासाठी प्रयत्न करतात. त्यामुळे गैरहजेरीचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस यांनी ही या उपक्रमाचे कौतुक केले होते.

अभिनंदन फलकामुळे स्टेज डेअरिंग
तसेच शाळेत आता अभिनंदन फलक हा उपक्रम सुरू झाला आहे. रोज परिपाठाच्या दरम्यान विद्यार्थी कथा, कविता, सुविचार, सुभाषित किंवा इतर कलागुणांचे सादरीकरण करतात. उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव अभिनंदन फलकावर ठळक अक्षरात लिहिण्यात येते. अभिनंदन फलकावर आपले नाव झळकावे यासाठी आता विद्यार्थ्यांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. शाळेत येताना विद्यार्थी रोज नवीन काही तरी सादर करण्याच्या तयारी करून येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात असलेली भीती दूर होऊन त्यांच्या सुप्त गुणांना चालना मिळते आहे.

बातम्या आणखी आहेत...