आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक:अवधान एमआयडीसीतील श्री ओम अँग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत; तेल कंपनीला 1 कोटी 20 लाखांमध्ये गंडवले

धुळे22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अवधान एमआयडीसीतील श्री ओम अँग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत येणाऱ्या कच्च्या मालाच्या बनावट व खोट्या पावत्या सादर करून सुमारे १ कोटी २० लाखांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी मोहाडी पोलिस ठाण्यात ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कंपनीचे संचालक संदीप हंसराज अग्रवाल (वय ५०) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. त्यानुसार कंपनीत तेलासाठी कच्चा माल पुरवला जातो. कंपनीत नवनीत भीमराव सोनवणे, ज्ञानेश्वर काशिनाथ जाधव, भूषण सुभाष चौधरी, अभय अरविंद पाटील हे कामाला होते.

तसेच दिलीप काळूसिंग निगरोट-राजपूत, ज्योतीसिंग काळूसिंग निगरोट, विलास कैलास पवार, गजानन सांडू पवार (सर्व रा. बुलडाणा) हे कच्चा माल घेऊन येत होते. सर्व माल वजनकाट्यावर मोजला जात होता. सर्व संशयितांनी आपसात कट रचून वजनकाट्यावर मोजणीसाठी येणारा माल अधिक दाखवला. त्यासाठी बनावट पावती दिली. त्यातून सुमारे १ कोटी २० लाखांचा गंडा घालण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.

बातम्या आणखी आहेत...