आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशासन:पावसाळ्यामध्ये दूषित पाणीपुरवठा टाळा; गळतीबाबत कार्यवाही करा

धुळे18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पावसाळ्यात शहरात दुषित पाणीपुरवठा होणार नाही, याची काळजी घ्यावी आणि जलवाहिनी गळतीबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशी सूचना आयुक्त देविदास टेकाळे यांनी केली. तसेच आरोग्य आणि पाणीपुरवठ्याबाबतही आढावा घेवून विविध कामांबाबत आयुक्तांनी संबंधित विभागप्रमुख व संबंधितांना सूचना केल्यात.

आयुक्तांच्या दालनात ही संयुक्त बैठक झाली. सद्यस्थितीत पावसाळ‌्याचे दिवस व एकूणच आरोग्य विभागातील कामाची, नागरिकांच्या दैंनंदिन समस्यावर उपाययोजना, कार्यवाहीसंदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यात शहरातील रस्त्यावरील काटेरी झाडे, रूईचे व गटारावरील गवत काढणे, स्वच्चता निरीक्षकांनी आपल्या प्रभागातील अनाधिकृत बॅनर काढणे, मोठे बॅनर काढणे आदीबाबत आयुक्तांकडून सूचना देण्यात आल्यात. या बैठकीला उपायुक्त डॉ.संगिता नांदुरकर, अभियंता चंद्रकांत ओगले, चंद्रकांत जाधव, मुख्य स्वच्छता निरीक्षक विकास साळवे, मलेरिया पर्यवेक्षक प्रसाद जाधव उपस्थित होते.

वीजपुरवठा खंडित, एक दिवस उशिरा पाणीपुरवठा
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बाभळे जलशुध्दीकरण केंद्र आणि मालेगाव रोड टाकी येथे बुधवारी (दि.१५) रोजी विजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे संपूर्ण देवपूर भाग, मोहाडी जलकुंभ, चक्करबर्डी जलकुंभ, ऑक्सिडेशन पॉड, बडगुजर टाकी, मायक्रो टॉवर जलकुंभ या जलकुंभावरील पाणीपुरवठा नियोजित वेळेपेक्षा एक दिवस उशिराने होणार आहे. तरी याची संबंधित भागातील नागरीकांनी नोंद घेवून महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन मनपाने केले आहे.

बातम्या आणखी आहेत...