आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोर्चा:ग्रामपंचायत कार्यालयास दिव्यांगांनी ठोकले टाळे

कापडणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिव्यांग व्यक्तींना निधी मिळत नसल्याने दोन महिन्यांपूर्वी कापडणे ग्रामपंचायत कार्यालयाला निवेदन दिले होते. मात्र, त्याची दखल न घेतल्याने सोमवारी दिव्यांग बांधवांनी ग्रामपंचायत कार्यालयावर धडक मोर्चा काढत कार्यालयाला टाळे टोकले.

या वेळी दिव्यांग जनता दल सामाजिक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष जाकीर शेख व जिल्हाध्यक्ष नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच, ग्रामविकास अधिकारी व सदस्य अनुपस्थित असल्याने संतप्त दिव्यांग बांधवांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या खुर्चीला निवेदन देत निषेध नोंदवत ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले. बराच वेळ झाल्यावर ग्रामविकास अधिकारी प्रवीण ठाकरे ग्रामपंचायत कार्यालयाजवळ येताच दिव्यांग बांधवांनी त्यांना घेराव घालत रोष व्यक्त केला. दिव्यांग बांधवांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. या वेळी ग्रामविकास अधिकारी प्रवीण ठाकरे व उपसरपंच महेश माळी यांनी दिव्यांग बांधवांना समजूत घालण्याचा प्रयत्न केला.

दिव्यांग बांधवांना शासन निर्णयानुसार ग्रामपंचायतीमार्फत मिळणारे लाभ त्वरित देण्यात यावे, गरजू दिव्यांगांना व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, दिव्यांगांसाठी ५० टक्के घरपट्टी तत्काळ माफ करावी, कापडणे ग्रामपंचायतीच्या ५ टक्के निधीचा लाभ द्यावा आदी मागण्यांसाठी आंदोलन झाले. त्यात अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे जगदीश माळी, सरलाताई माळी, दीपक माळी, सुमनबाई खलाणे, हिरालाल बडगुजर, निंबा माळी, रमेश पाटील, प्रवीण माळी, हर्षल माळी आदी सहभागी झाले.

बातम्या आणखी आहेत...