आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षण वाऱ्यावर:अवधान जिल्हा परिषद शाळेची तीन वर्षांपूर्वी पत्रे उडूनही दुर्लक्ष; शाळा उघडल्यावर विद्यार्थी बसणार कुठे?

धुळे17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तीन वर्षांपूर्वी अवकाळी पावसाच्या वादळात अवधान येथील जिल्हा परिषद शाळेचे पत्रे उडाली होती. त्या नंतर तीन वर्षांचा कालावधी उलटत आला आहे. मात्र अद्याप या शाळेत दुरुस्ती करण्यात आलेली नाही. परिणामी दोन दिवसानंतर शाळा उघडतील तेव्हा विद्यार्थ्यांना बसवावे कोठे असा प्रश्न पालक आणि शिक्षकांच्या समोर आहे. शाळेची डागडुजी करण्यासाठी मागील तीन वर्षांपासून पालकांचा पाठपुरावा सुरू आहे.

महानगर पालिका हद्दवाढीत अवधान गावाचा महापालिकेत समावेश झाला आहे. मात्र गावातील प्राथमिक शाळा अद्याप जिल्हा परिषदेच्या अखत्यारित आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्यालयापासून सर्वात जवळची ही शाळा आहे. तीन वर्षांपूर्वी मान्सूनपूर्व झालेल्या वादळी वाऱ्यामुळे अवधान जिल्हा परिषद मराठी शाळेला फटका बसला. वादळात पत्रे उडून गेली तसेच भिंती क्षतिग्रस्त झाल्या आहेत. त्यानंतर तीन वर्षांचा कालावधी उलटला आहे.

आतापर्यंत या शाळेची कुठल्याही प्रकारे डागडुजी, दुरुस्ती करण्यात आलेली नाही. दोन वर्षे कोरोनामुळे शाळाच भरल्या नाहीत. यामुळे अडचण आली नाही. दुरुस्तीच्या अभावाने शाळा आता खंडर वाटू लागली आहे. यासंदर्भात वेळोवेळी प्रशासनाकडे चौकशी केली. अर्ज विनंतीदेखील करण्यात आल्या. मात्र शाळेच्या दुरुस्तीबाबत जिल्हा परिषद प्रशासन कमालीचे उदासीन आहे. दरम्यान आता पुढील आठवड्यात शाळा सुरू होणार आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना कोठे बसवावे, असा प्रश्न समोर आहे.

बातम्या आणखी आहेत...