आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:सजीव देखाव्यांतून जागृती , कलावंताना व्यासपीठ; शहरातील अष्टविनायक मित्र मंडळातर्फे सामाजिक उपक्रमांवर दिला जातो भर

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील खोलगल्लीतील अष्टविनायक मित्र मंडळातर्फे गेल्या १६ वर्षापासून गणेशोत्सवात पथनाट्य व सजीव देखाव्यांतून सामाजिक प्रबोधन केेले जाते आहे. स्थानिक कलावंतांना व्यासपीठ देण्यासाठी सजीव देखावे केले जातात. गणेशोत्सवात सामाजिक विषयावर जनजागृती करण्याची शहरातील मंडळाची परंपरा आहे. त्यात खोलगल्ली अर्थात बांबू गल्लीत अष्टविनायक मित्र मंडळाचा समावेश आहे. या मंडळाची स्थापना सन १९८० मध्ये झाली. मंडळाचे ४३ वे वर्ष आहे. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, कै. तुषार सराफ, चंद्रकांत गुजराती, कुंदन वानखेडकर, बापू खलाणे, धनराज दाभाडे आहे. अष्टविनायक मित्र मंडळाने काही वर्ष देशातील विविध मंदिराच्या प्रतिकृतीची आरास उभारली.

त्यात तिरुपती बालाजी, दगडूशेट हलवाई गणपती, सूवर्णमंदीर, लाल किल्ला, निळकंठेश्वर महादेव मंदिर, महेश्वर आदींचा समावेश आहे. पण सन २००६ पासून मंडळाने स्थानिक कलाकारांना संधी देण्यासाठी विविध सामाजिक विषयावर सजीव देखावे व पथनाट्य सादर करण्यास सुरुवात केली. ही प्रथा आजपर्यंत कायम आहे. पथनाट्याच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन, ज्वलंत विषय, व्यसनधिनताेवर प्रकाशझोत टाकण्यात आला. या प्रकारचा वेगळा उपक्रम करणारे अष्टविनायक मित्र मंडळ शहरातील प्रथम मंडळ आहे. मंडळातर्फे सामाजिक बांधिलकीतून विविध उपक्रम राबवण्यात येत असल्याची माहिती मंडळाच्या पदाधिकाऱ्याकडून देण्यात आली.

व्यसनाधिनतेवर आसूड
मंडळाने देशभक्ती, डेंग्यू, चिकनगुणीया, शेतकरी आत्महत्या, अतिरेकी हल्ला, व्यसनधीनता, अवैध धंदे आदी विषयावर सामाजिक प्रबोधन केले आहे. अष्टविनायक मंडळ नेहमी सामाजिक आशय व चालू घडामोडीवर भाष्य करत असल्याने मंडळाच्या देखाव्यांची नागरिकांना उत्सुकता असते. यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची एकनिष्ठता हा विषय घेऊन आरास साकारली आहे.

बातम्या आणखी आहेत...