आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील शिरडाणे प्र. हा. येथील सार्वजनिक सभागृहात महिला मेळावा व बालविवाह प्रतिबंधक जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी नाटिका, पथनाट्य व मेळाव्याला उपस्थितांकडून बालविवाह प्रतिबंधाबाबत जनजागृती व प्रबाेधन करण्यात आले. ग्रामपंचायतीच्या सभागृहात जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने हा मेळावा घेण्यात आला. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्षा अश्विनी पवार हाेत्या. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. संदीप स्वामी, महिला सभापती संजीवनी सिसाेदे, दिशा समिती सदस्य अरविंद जाधव, फागणे पंचायत समिती सदस्य सुरेखा बडगुजर, जिल्हा महिला बालविकास अधिकारी सचिन शिंदे, गटविकास अधिकारी रावसाहेब वाघ, बालविकास प्रकल्प अधिकारी बी. एन. चाैधरी, डाॅ. माेहनकुमार जगताप आदी उपस्थित हाेते.
महराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन हाेऊन त्यांचा राेपे देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी न्यायमूर्ती यांनी बालविवाह प्रतिबंधक कायद्याबाबत मार्गदर्शन केले. सभापती संजीवनी सिसाेदे यांनीही महिला शिक्षणाबाबत माहिती दिली. बुवनेश्वरी एस. यांनी बालविवाह दुष्परिणाम, महिलांचे महत्त्व आदी विषयांवर मार्गदर्शन करीत गावातील महिला, विद्यार्थिनी यांच्याशी संवाद साधला. अध्यक्षीय समाराेपात अश्विनी पवार यांनी महिला सक्षमीकरणाचे महत्त्व सांगितले. अॅड. रसिका निकम यांनी महिला शिक्षण व कायदेबाबत माहिती दिली. अॅड. चंद्रकांत येशीराव यांनी बालविवाह प्रतिबंध व त्याबाबतचे कायद्याची माहिती दिली.
तर डाॅ. राेहनकुमार जगपा यांच्यातर्फे माेफत आराेग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. याप्रसंगी उपस्थित सर्वांनी बालविवाह प्रतिबंधक संदर्भात सामूहिक शपथ घेतली. सूत्रसंचालन विस्तार अधिकारी सुजाता बाेरसे यांनी केले. प्रास्ताविक शिरडाणेच्या ग्रामविकास अधिकारी सुरेखा ठाकरे यांनी केले. याप्रसंगी सरपंच सुरेश पाटील, उपसरपंच चुडामण पाटील, ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी साेसायटीचे पदाधिकारी, ग्रामस्थ, महिला विद्यार्थी, विद्यार्थिनी, अंगणवाडी कर्मचारी, आशा कार्यकर्ती, आरोग्य अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते. यशस्वितेसाठी विस्तार अधिकारी भीमराव गरुड, एन. आर. पाटील, आर. डी. महिंदळे यांनी सहकार्य केले.
मुलींना जन्म देणाऱ्या मातांचा केला गौरव
जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीतावर नृत्य केले. मुलगी शिकवा स्वावलंबी बनवा ही नाटिका सादर करण्यात आली. तसेच बालविवाह बंदी यावर दामिनी महिला अत्याचार कक्षाच्या पथकाने पथनाट्य सादर केले. तसेच ग्रामपंचायतीतर्फे गावातील फक्त मुलींना जन्म देणाऱ्या मातांचा साडी-चाेळी देऊन सत्कार केला गेला. तसेच नवजात बालिका व तिच्या आईचे व पाळणा पूजन करीत सत्कार झाला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.