आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यशाळा‎:पोक्सो कायद्यावर‎ विद्यार्थ्यांचे प्रबोधन‎

धुळे‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील एसएसव्हीपीएस‎ संस्थेच्या ना. स. पाटील साहित्य‎ आणि मुफिमुअ वाणिज्य‎ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना‎ विभाग, पोलिस मुख्यालय आणि‎ महापालिकेतर्फे पोक्सो कायद्यावर‎ जनजागृतीसाठी कार्यशाळा झाली.‎ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी‎ संरक्षण शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.‎ रवींद्र वाघ हाेते. या वेळी डॉ. मोहन‎ पावरा, पोलिस अधीक्षक संजय‎ बारकुंड, अप्पर पोलिस अधीक्षक‎ किशोर काळे, अप्पर सहायक‎ पोलिस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी,‎ पोलिस निरीक्षक मोतीराम निकम,‎ सहायक पोलिस निरीक्षक सचिन‎ बेंद्रे, डॉ. संभाजी पाटील, डॉ.‎ अभयकुमार खैरनार, विद्यार्थी‎ विकास अधिकारी डॉ. सदाशिव‎ सूर्यवंशी, राष्ट्रीय सेवा योजना‎ विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ.‎ नीलेश पाटील, सहायक कार्यक्रम‎ अधिकारी डॉ. शरद भामरे, महिला‎ कार्यक्रम अधिकारी डॉ. कल्पना‎ पाटील उपस्थित होते. या वेळी‎ सहायक पोलिस अधीक्षक‎ ऋषिकेश रेड्डी यांनी बलोपासनेचे‎ महत्त्व सांगितले. तसेच पोक्सो‎ कायद्याची माहिती दिली.

आपण‎ समाजाचे देणे लागतो, या भावनेतून‎ सर्वांनी बाल अत्याचार आणि‎ शोषणावर जागृती करावी, असे‎ आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे‎ प्रास्ताविक डॉ. मोहन पावरा यांनी‎ केले. प्रा. डॉ. शरद भामरे यांनी‎ आभार मानले.‎

बातम्या आणखी आहेत...