आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रबोधन:जिल्ह्यात 63 गावांमध्ये शासन योजनांवर जागर, राबवलेल्या योजनांची उपक्रमातून नागरिकांना माहिती

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षांत राबवलेल्या योजनांची उपक्रमातून नागरिकांना माहिती

महाविकास आघाडी सरकार स्थापनेला दोन वर्षे झाल्याने जिल्हा माहिती कार्यालयातर्फे शासकीय योजनांवर जिल्हाभरात जनजागृती करण्यात आली. जिल्ह्यातील ६३ गावांमध्ये कलापथकाच्या माध्यमातून योजनांची माहिती देण्यात आली. या उपक्रमाचा नुकताच समारोप झाला.

जनजागृतीसाठी श्री सद‌्गुरू सांस्कृतिक कला बहुउद्देशीय संस्था, महात्मा फुले कृषक मंडळ व बहुउद्देशीय संस्था, तऱ्हाडी, श्रमिक बहुउद्देशीय सेवा संस्थेचे नटराज कला पथक, श्री चिराई देवी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेची निवड झाली होती. या संस्थेच्या कलावंत जिल्ह्यातील ६३ गावांत शासकीय योजनांवर जागृती केली. श्री सद‌्गुरू सांस्कृतिक कला बहुउद्देशीय संस्थेच्या कलावंतांनी सोनगीर, कापडणे, कुसुंबा, फागणे, मुकटी, आर्वी, नेर, लामकानी, बोरीस, शिरूड, नावरा, बोरकुंड, न्याहळोद, निमूगळ, नगाव, बोरविहीर, विंचूर, मेहेरगाव, काळखेडे, बळसाणे, निजामपूर येथे, महात्मा फुले कृषक मंडळाच्या कलावंतांनी भामपूर, अर्थे, भटाणे, तऱ्हाडी, बोराडी, पळासनेर, अजंदे, रोहिणी, तोंदे, होळ, भाटपुरा, करवंद, दहिवद, थाळनेर, अहिल्यापूर, जैताणे, पिंजारझाडी, आमळी, वार्सा, बारीपाडा, गणेशपूर येथे, नटराज कलापथक व चिराईदेवी सेवाभावी संस्थेच्या कलावंतांनी म्हसदी, कासारे, पिंपळनेर, कंचनपूर, वालखेडा, बेटावद, नरडाणा, विरदेल, धमाणे, कमखेडे, शिंदखेडा, बाह्मणे, नेवाडे, निमगूळ, दोंडाईचा, चिमठाणे, सवाई मुकटी, खलाणे, साक्री, दहिवेल येथे कार्यक्रम सादर केले. पथकांनी सादर केलेल्या कार्यक्रमांना ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिवभोजन योजना, कोरोना बाधितांवर उपचार, आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण, विकेल ते पिकेल अभियान, महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, इमारत बांधकाम कामगारांना कोरोना काळात प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत, कामगार विभागातर्फे घरेलू कामगारांना मदत, रिक्षा चालकांना मदत, कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांना पाच लाख रुपयांची मदत आदी योजनांची माहिती दिली गेली.

बातम्या आणखी आहेत...