आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत २०२१-२२ मध्ये विविध विकास कामांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून कसे नियोजन केले जाते आहे. समितीचे अध्यक्ष, सचिव कोण असतात याची माहिती देण्यासह शासनाच्या जनकल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माहिती व जनसंपर्क अधिकारी कार्यालयातर्फे श्री सद्गुरू संस्कृतिक कला बहुद्देशीय संस्थेच्या माध्यमातून जनजागृती केली जाते आहे. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि राज्य शासनाने दोन वर्षांत केलेल्या जनकल्याणकारी योजनांची माहिती तसेच जिल्हा वार्षिक योजनांची माहिती श्री सद्गुरू सांस्कृतिक कला बहुद्देशीय संस्थेच्या माध्यमातून शाहीर श्रावण वाणी यांच्या लोककला पथकातर्फे दिली जाते आहे.
त्यानुसार अजंग, नवलनगर, चांदे, भिरडाई, देऊर, धामणगाव, धनूर, गोंदूर, हेंद्रूण, कावठी, खंडलाय, कुंडाणे-वार मांडळ, मोघण, रतनपुरा, शिरडाणे, तामसवाडी, वडेल, तिसगाव, ढंढाणे, विश्वनाथ आदी जनजागृती करण्यात आली. पालकमंत्री अब्दुल सत्तार, जिल्हाधिकारी सचिव जलज शर्मा, जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, जिल्हा जनसंपर्क अधिकारी गोपाल साळुंखे, समाजकल्याण सहायक आयुक्त हर्षदा बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली चैतन्य मोरे, इस्माईल मनियार, बंडू चौधरी, अरुण वंजारी, गटविकास अधिकारी आर. डी. वाघ, अप्पर तहसीलदार संजय शिंदे, कृषी उत्पन्न बाजार बाजार समितीचे सचिव देवेंद्र पाटील यांचे सहकार्य लाभले. कला पथकातील भारूडकार रमेश पाटील, गायक गोकुळ भदाणे, अहिराणी चित्रपट कलावंत विद्या भाटिया, अॅड. शीतल जावरे, सरिता अमृतकर, हर्षदा शेलार, देविदास भवरे, वसंत अहिरे, गोपीचंद सुरीत पाटील, रामदास पाटील, लालचंद पाटील, मुरलीधर पाटील, शरद खैरनार, कैलास चौधरी, राजेश खलाणे, काळू धना पाटील, सहायक व्यवस्थापक शरद देवरे, वाल्मीक पाटील, प्रा. डॉ. चंद्रकांत वाणी, मोहन अमृतकर, गोकुळ अहिरे जनजागृती करत आहे. या उपक्रमाला जिल्हाभरातून चांगला प्रतिसाद मिळत असल्याची स्थिती आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.