आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:जिल्हा विज्ञान प्रदर्शनात आयुष, साहीलची बाजी; प्राथमिक शिक्षक गटात शिरपूरचे गजानन लांबोरडे प्रथम

धुळे23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य विज्ञान शिक्षण संस्था व शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तालुकास्तरावर विज्ञान प्रदर्शन झाले होते. त्यानंतर जिल्हास्तरावर ऑनलाइन प्रदर्शन झाले. त्यात पिंपळनेर येथील एनएसपी विद्यालयातील आयुष भदाणे व जयहिंद हायस्कूलमधील साहील साळुंके यांनी प्रथम क्रमांक मिळवला.तालुकास्तरावर निवड झालेल्या वैज्ञानिक उपकरणांसह शैक्षणिक साहित्याची माहिती गूगल फाॅर्म व व्हिडिओ मागवण्यात आली.

प्रत्येक गटासाठी स्वतंत्र परीक्षकांची नेमणूक करून परीक्षण करण्यात आले. के. सी.साळुंके, आर.ए. चित्ते, शीतल कापुरे, के.एस. बच्छाव, नीलेश देसले, सुधाकर माळी, एस.आर. भदाणे, एस.डी. शेवाळे, हर्षल पवार, आर.बी. मगर, जे.डी. भदाणे, पी. एच. जाधव यांनी परीक्षण केले. त्यानंतर जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा निकाल शिक्षणाधिकारी मोहन देसले व विज्ञान पर्यवेक्षक सुधाकर बागुल यांनी जाहीर केला.

प्रदर्शनासाठी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आर.व्ही. पाटील, सचिव उदय तोरवणे, विज्ञान संघाचे जिल्हाध्यक्ष पी.झेड. कुवर, कार्याध्यक्ष संजय पवार, सचिव सी.टी. पाटील, उपक्रमप्रमुख संजय गोसावी, के.डी. बच्छाव यांनी प्रयत्न केले. उच्च प्राथमिक गटात आयुष मधुकर भदाणे एनएसपी विद्यालय पिंपळनेर (प्रथम), सर्वज्ञ अनंत पाटील, हस्ती पब्लिक स्कूल दोंडाइचा (द्वितीय), भावेश सोमनाथ शेलार, राजीव गांधी विद्यालय (तृतीय), रवीन तुकाराम पावरा, आर.सी. पटेल प्राथमिक आश्रमशाळा, निमझरी (राखीव प्रथम), सय्यद मतिन फहिम अली हाजी मो. उस्मान, मराठी मुलांची शाळा (उत्तेजनार्थ) बक्षीस मिळवले. माध्यमिक गटात साहील सुनील साळुंके जयहिंद ज्युनिअर कॉलेज धुळे (प्रथम), यश माळी, डॉ. पी. आर. घोगरे ज्यु कॉलेज शिरपूर (द्वितीय), रागिणी गोविंद गांगुर्डे हस्ती पब्लिक स्कूल, दोंडाईचा (तृतीय), उदय मकराम पावरा, महादेव आदिवासी आश्रमशाळा, अनेरडॅम (राखीव प्रथम) तर कृतज्ञा प्रदीप भदाणे, न्यू इंग्लिश स्कूल, साक्री (उत्तेजनार्थ). प्राथमिक शिक्षक गट : गजानन लांबोरडे, आर.सी. पटेल शाळा शिरपूर (प्रथम), महेश अशोक बाविस्कर, गुरुदत्त हायस्कूल, वायपूर (द्वितीय), दीपाली सुभाष पवार, जि.प. शाळा बोरविहीर (उत्तेजनार्थ). दरम्यान, धुळे, शिंदखेडा, साक्री, शिरपूर तालुक्यात झालेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर थक्क करणारे प्रयोग सादर केले होते. त्यामुळे जिल्हास्तरावर जाण्यासाठी चढाओढ असल्याचे दिसून आले.

शिक्षक गटातील विजेते
माध्यमिक शिक्षक गट : विवेक पाटील, आर. सी. पटेल शिरपूर (प्रथम), नारायण भिलाणे, वाल्मीक ऋषी मा. वि. तावखेडा (द्वितीय), मीनाक्षी देशमुख सवित्रीबाई देवरे कन्या विद्यालय बोरीस (उत्तेजनार्थ). प्रयोगशाळा परिचर गट : ज्ञानेश्वर कुवर, कवी कुसुमाग्रज शाळा अर्थे (प्रथम), विजय चौधरी, हस्ती पब्लिक स्कूल दोंडाईचा (द्वितीय), राजेश बेडसे, आदर्श विद्या मंदिर निजामपूर (उत्तेजनार्थ).

बातम्या आणखी आहेत...