आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवैध सावकारी:बबन थोरातला अटक, कोठडी; प्राणघातक हल्ला, खंडणी मागितल्याचा आरोप

धुळे4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेचे शहर समन्वयक नितीन उर्फे बबन थोरात यांच्या विरोधात देवपूर पोलिस ठाण्यात अवैध सावकारी, खंडणी व प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर बबन थोरात यांना अटक झाली.

देवपुरातील भगवती नगरातील रहिवासी संजय किसन चौधरी यांनी याबाबत तक्रार दिली आहे. त्यानुसार नितीन उर्फे बबन मधुकर थोरात यांच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते. त्यासाठी घराची कागदपत्रे व महत्त्वाचे दस्तऐवज दिले होते. कर्जाची परतफेड केल्यानंतर पुन्हा कर्ज घेतले. पण काही दिवसांपासून कर्ज-व्याजापोटी २ लाख ४० हजार रुपये घेणे असल्याचे सांगून बबन थोरात पैशांची मागणी करत होते. त्यातून दमदाटी केली. गेल्या फेब्रुवारी महिन्यात कुंडाणे फाट्याजवळ बबन थोरात व त्यांच्या कारचालकाने अडवून पैशांची मागणी करत मारहाण केली. त्यात संजय चौधरी यांच्या मेंदूला अंतर्गत दुखापत होऊन नस तुटली. त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला. त्रास झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले. तसेच त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली.

तक्रारदार संजय चौधरी रुग्णालयात दाखल असतानाही पैशांची मागणी करण्यात आली. अन्यथा दुकानाचे ताबेगहाण कागदपत्रे देणार नाही, असे धमकावण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यावरून सोमवारी देवपूर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी रात्री बबन थोरात यांना अटक केली आहे. मंगळवारी दुपारी त्यांना न्यायालयाने उभे केल्यावर त्यांची २३ जूनपर्यंत पोलिस कोठडीत पाठवले.

चालकाचाही शोध सुरू
संशयिताला अटक करण्यात आली आहे. संबंधित वाहन चालकाचे नाव अजून समोर आलेले नाही. त्याबाबत चौकशी सुरू आहे. तसेच गुन्ह्यात अन्य कोणाचा हस्तक्षेप आहे का या दिशेने तपास सुरू आहे.
एम. टी. निकम, पोलिस निरीक्षक

बातम्या आणखी आहेत...