आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:सुसरी प्रकल्पातून गाळ काढण्यास बंदी; अंदाजपत्रक तयार करून दुरुस्तीही करण्यात येणार

खेडदिगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहादा तालुक्यातील सुसरी प्रकल्पात अधिकचा गाळ उपसामुळे उन्हाळ्यात पाणी पाझरून धरण कोरडे होते व पाण्याच्या दिवसात पाणी भरल्याने धरणालगत असलेल्या शेतात पाणी शिरून नुकसान होते. म्हणून यावर्षी गाळ उपसास बंदी असल्याची माहिती मध्यम प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता तू. प्र. चिनावलकर यांनी दिली.

तसेच विनापरवाना गाळ उपसा करताना आढळून आल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांच्या नावाखाली व्यावसायिक अवैध पिवळी माती पोखरून घेऊन जात असल्याने धरणातून अधिक खोलीकरण झाल्याने पाणीसाठा पाझरून पाण्याचा ठणठणाट होत असल्याने सुसरी धरणातून गाळ उपसा बंद करण्यात आला आहे. गाळ ऐवजी धरणाच्या कोपऱ्यात जास्त प्रमाणात पिवळी माती कोरतात.

यामुळे धरण पाझरून शेतात पाणी जाणे, रस्त्यावर पाणी जाणे असे प्रकार होतात. यामुळे विविध समस्या उद‌्भवतात. यासाठी ज्या ठिकाणी पाण्याचा पाझर होतो, त्याठिकाणी दुरुस्तीसाठी अंदाजपत्रक तयार करून दुरुस्ती करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...