आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिवाळी पर्वात होणाऱ्या तालुक्यातील अस्तंभा यात्रेच्या तयारी आणि नियोजनासाठी अस्तंभा गावातील उमेदवार व अस्तंभा यात्रा उत्सव समितीची तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीत आताच्या अस्तंभा ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक काळात तसेच अस्तंभा यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची सूचना देऊन खबरदारी घेण्याचे आवाहन बैठकीत करण्यात आले.
अस्तंभा यात्रेत गावातील ३० स्वयंसेवक नेमावेत. यात्रेत डी. जे. साऊंड व बँड वाजवले जाणार नाहीत, याची दक्षता गावकऱ्यांनी घ्यावी. तसेच गावकऱ्यांनी आपल्या गावातील निवडणूक व यात्रा शांततेत पार पाडावी, अशी सूचना व मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी तहसीलदारांनी यात्रेत लावण्यात येणारे बंदोबस्ताची व पार्किंगची व्यवस्थेबाबत पाहणीसह कर्मचारी यांच्या राहण्याची व्यवस्थाबाबत पाहणी करून अस्तंभा व असली गावातील मतदान केंद -बुथला भेट दिली. बैठकीत ज्ञानेश्वर सपकाळे, पोलिस निरीक्षक आय.एन. पठाण, नायब तहसीलदार उकरडे, बिट अंमलदार पोना दीपक वारुळे, पो.हे.का स्वप्नील गोसावी, पोह पुष्पेंद्र कोळी, पोह जयेश गावित, विवेक नागरे, ग्रामसेवक मानसिंग वळवी, पोलिस पाटील आंबिलाल वसावे, कविता पोपटा वसावे, माजी सरपंच वनसिंग वळवी आदी उपस्थित होते
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.