आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकदम ओके:पन्नास खाेके एकदम ओके देखाव्यावर बंदी

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गणेशाेत्सवानिमित्त शहरातील भगवा चौक गणेश मंडळाने राज्यातील सत्तांतरावर सजीव देखावा केला आहे. देखावा खुला हाेण्यापूर्वीच पोलिसांनी मंडळाला प्रतिबंधात्मक नोटीस बजावली होती. त्यानंतरही शुक्रवारी या देखाव्याचा पहिला प्रयोग सादर झाला. या वेळी पोलिसांनी देखावा सादर करू नये किंवा राजकीय भाग वगळण्यात यावा, अशी सूचना केली.

शहरातील बहुतांश गणेश मंडळाच्या आरास शुक्रवारी खुल्या झाल्या. शहरातील भगवा चौक गणेश मंडळाने यंदा राज्यात झालेल्या सत्तांतरावर पन्नास खोके एकदम ओके हा सजीव देखावा तयार केला. या देखाव्यातील काही मुद्द्यावर आक्षेप घेत पोलिसांनी भगवा चौक गणेश मंडळाचे पंकज गोरे यांना प्रतिबंधात्मक नोटीस बजावली. दुसरीकडे शुक्रवारी रात्री मंडळातर्फे देखाव्याचे सादरीकरण झाले.

या देखाव्यामुळे राजकीय भावना दुखावल्या जातील. त्यामुळे हा देखावा सादर करू नये अशी सूचना पोलिसांनी मंडळाला केली आहे. तसेच देखावा सादर केला तर मंडळाचे पदाधिकारी व कलावंतांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. त्यामुळे पन्नास खोके एकदम ओके हा सजीव देखावा रद्द करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान, पहिल्या दिवशी शुक्रवारी हा देखावा खुला झाल्यावर तो पाहण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचे दिसून आले.

बातम्या आणखी आहेत...