आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोलाचा सल्ला:जीवनात खूप मोठे व्हा पण आई, वडिलांसह गुरुजनांना विसरू नका; आमदार अमरीश पटेलांचा सल्ला

शिरपूर8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जीवनात खूप मोठे व्हा, उज्ज्वल भविष्य घडवा पण भविष्यात आई-वडिलांसह गुरुजनांना कधीही विसरू नका. कुटुंबाला मजबूत करा. तसेच इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवण्याचा प्रयत्न करा, असा सल्ला आमदार अमरीश पटेल यांनी गुणवंतांना दिला.

येथील आर. सी. पटेल शैक्षणिक संस्थेच्या विविध शाळेतील दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झाला. त्या वेळी ते बोलत होते. आर.सी. पटेल मेन बिल्डिंगमधील राजगोपाल चंदुलाल भंडारी हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला. या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी,सचिव प्रभाकर चव्हाण, संचालक बबनलाल अग्रवाल, इंग्लिश स्कूलचे चेअरमन योगेश भंडारी, फिरोज काझी, जाकीर शेख, सीईओ डॉ. उमेश शर्मा, प्राचार्य पी. व्ही. पाटील, प्राचार्य आर. बी. पाटील, मुख्याध्यापक अमोल परब, पर्यवेक्षक एन. ई. चौधरी, पर्यवेक्षक जे. पी. पाटील उपस्थित होते.

आमदार अमरीश पटेल म्हणाले की, संस्थेतील ९२६ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण प्राप्त केले. ही कौतुकास्पद बाब आहे. चांगली पिढी घडवण्यासाठी शिरपूर एज्युकेशन सोसायटी प्रयत्नशील आहे. गुणवत्तेला प्राधान्य दिले आहे. त्यासाठी अनेकदा वाईटपणा घ्यावा लागला. संस्थेतून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना भरमसाट पगाराची नोकरी मिळते. मुंबईच्या डी.जे.संघवी इंजिनिअरिंगचे हजारो विद्यार्थी परदेशात नोकरीस आहे. मुंबई, बंगळुरू, हैदराबाद,शिरपूर, इंदूर, नवी मुंबई, धुळे, चंदीगड,अहमदाबाद,शिरपूर येथे हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज सुरू करणार आहे. सर्वसामान्यांचे जीवनमान बदलण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणासह पाण्याची व्यवस्था करण्यास प्राधान्य आहे. गुणवंत विद्यार्थ्यांनी यशाने हुरळून जाऊ नये. कौशल्य विकसित करावे, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाला आर.एन. पवार, व्ही.पी. दीक्षित, व्ही. आर.सुतार, एन.सी.पवार, पी.आर. साळुंखे, आर.एफ. शिरसाठ आदी उपस्थित होते.

संस्थेच्या विविध शाळेतील १ हजार ७८५ विद्यार्थी उत्तीर्ण
आर. सी. पटेल संस्थेच्या सर्व २१ शाळांचा निकाल १०० टक्के लागला. संस्थेचे १ हजार ७८५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. संस्थेतील ९२६ विद्यार्थ्यांना ९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळाले. संस्थेचे १ हजार ७६८ विद्यार्थी म्हणजेच ९९.०५ टक्के विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले. शहरातील एच. आर. पटेल कन्या विद्यालयाची स्नेहा रवींद्र भावसार ९७.२० टक्के गुण मिळवून शिरपूर तालुक्यात प्रथम आली.

बातम्या आणखी आहेत...