आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे:पत्नी-मुलांना मारहाण, तहसीलदारांवर गुन्हा

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिंदखेडा येथील तहसीलदार सुनील महादू सैंदाणे यांनी पत्नी व मुलांना हॉकी स्टिक व रॉडने मारहाण केली, अशी तक्रार त्यांच्या पत्नीने दिली आहे. त्यावरून तहसीलदार सैंदाणे यांच्यासह पाच जणांविरुद्ध शिंदखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तहसीलदार सुनील सैंदाणे व त्यांच्या पत्नी वैशाली यांच्यात कौटुंबिक वाद असून तो न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. वैशाली सैंदाणे या गायत्रीनगर या ठिकाणी आल्या असताना सुनील सैंदाणे, मीना अशोक बोडके, दयाराम बाबुलाल सोनवणे, योगेश पवार, निशा योगेश पवार यांनी दमदाटी केली. तसेच हॉकी स्टिक, रॉडने वैशाली सैंदाणे व इतरांना मारहाण केली. तसेच पुन्हा येथे आले तर कायमचे संपवून टाकू अशी धमकी दिली.

बातम्या आणखी आहेत...