आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशाेभिकरण:एकवीरादेवी मंदिराच्या परिसराचे सुशाेभिकरण

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील खान्देश कुलस्वामिनी श्री एकवीरादेवी मंदिर परिसर सुशाेभिकरण कामाचा मार्ग माेकळा झाला आहे. या कामाला पर्यटन व सांस्कृतिक मंत्रालयाने दिलेली स्थगिती उठवली असल्याची माहिती आमदार मंजुळा गावित यांच्याकडून देण्यात आली आहे.श्री एकवीरादेवी मंदिर परिसरात विकास कामे करणे, सभामंडप, प्रवेशद्वार, भक्तनिवास आदी कामांसाठी पर्यटन व सांस्कृतिक विभागाकडून ३ काेटींचा निधी फेब्रुवारी २०२२ मध्ये मंजूर करण्यात आला हाेता. त्यापैकी ९० लाखाचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडेही वर्ग करण्यात आला हाेता.

सार्वजनिक बांधकाम विभागाने व एकविरा देवी, रेणुकामाता ट्रस्टचे पदाधिकाऱ्यानंी मंदिराच्या विकास कामांचा आराखडा तयार करून त्याची निविदाही प्रसिध्द केली. परंतु शासनाकडून आचनाक सन २०२१-२२ या वर्षात प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांसंदर्भात स्थगिती दिली. ती उठल्याने खान्देश कुलस्वाभिनी श्री एकविरा देवी मंदिराच्य विविध विकास कामांचा मार्ग माेकळा झाला आहे. संबंधित एजन्सीस लरवकरच कार्यारंभ आदेश देण्यात येईल. मंदिराचे सुशाेभिकरणाचे काम लवकरच सुरू करण्यात येईल असे आमदार मंजुळा गावीत यांनी कळवले आहे.

अखेर स्थगिती उठवली
मंदिर ट्रस्टीच्या विनंतीनुसार मुख्यमंत्री आणि पर्यटन व सांस्कृतिक मंत्री यांना स्थगिती उठवण्याची विनंती केली हाेती. या विनंतीला मान देऊन त्यांनी एकविरा देवी मंदिर येथील विकास कामांबाबत कार्यवारी करण्यास मान्यता दिल्याचेे आदेश काढले.

बातम्या आणखी आहेत...