आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात गुढीपाडव्याचा व नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर शहरातील श्री जागनाथ महादेव मंदिर परिसरात विकास कामांसाठी आदिवासी विकास मंत्री अॅड. के. सी. पाडवी व नवापूर तालुक्याचे आमदार शिरीषकुमार नाईक यांनी ९७ लक्ष निधी मंजूर करून दिला आहे. या कामाचे भूमिपूजन आमदार शिरीषकुमार नाईक व माजी जि.प. अध्यक्षा रजनी नाईक यांचा हस्ते करण्यात आले.
या वेळी नगराध्यक्षा हेमलता पाटील, उपनगराध्यक्ष आयुब बलेसरिया, विरोधी पक्षनेता नरेंद्र नगराळे, शिवसेना जिल्हा उपप्रमुख हसमुख पाटील, नगरसेविका अरुणा पाटील, नगरसेवक आरिफ बलेसरिया, उमराण ग्रामविकास संस्था सचिव दीपक वसावे, मंगला सैन, बबिता वसावे, विश्वास बडोगे, विशाल सांगळे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष शरद पाटील, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश पाटील, माजी नगरसेवक दर्शन पाटील, विनय गावित, अजय पाटील, हरीश पाटील, फारुक शाह, शिवसेना शहर प्रमुख अनिल वारुडे, प्रवीण ब्रम्हे, विक्रम पाटील, सुरेश पाटील, यशवंत पाटील, विनायक पाटील, सुभाष कुंभार, धाकू मोरे, जागनाथ महादेव मंदिराचे ट्रस्टी मनोहरलाल दलाल, रजनिकांत दलाल, किशोर दलाल, प्रफुल दलाल, दिलीप दलाल, अल्पेश दलाल, समीर दलाल, बिनाग दलाल, जनक दलाल, जतीन दलालसह परिसरातील नागरिक उपस्थित होते. या वेळी आमदार शिरीषकुमार नाईक म्हणाले की, शहरात असंख्य विकास कामांना सुरुवात झाली आहे. जास्त बोलण्यापेक्षा कामांना प्राधान्य दिले आहे. सातत्याने पाठपुरावा करत निधी आणला आहे. महाविकास आघाडीचा सरकारचा माध्यमातून निधी नवापूर मतदारसंघाला मिळाला आहे. सूत्रसंचलन किरण टिभे यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.