आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहापालिकेतर्फे स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत वेस्ट टू वंडर या संकल्पनेतून प्रभाग क्रमांक ५ मधील तुळशीराम नगरातील उद्यानाचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. त्यानुसार उद्यानात मृणाल गायकवाड व डॉ. राजेंद्र निकम यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
या वेळी आयुक्त देविदास टेकाळे, महापालिकेचे उपायुक्त विजय सनेर, अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस, सामाजिक कार्यकर्ते अरुण पवार, आरोग्य विभागाचे कार्यालयीन प्रमुख राजेंद्र माईनकर, कनिष्ठ अभियंता नरेंद्र बागुल, प्रदीप चव्हाण, मुख्य स्वच्छता निरीक्षक राजेश वसावे, लक्ष्मण पाटील, मलेरिया पर्यवेक्षक विकास साळवे आदी उपस्थित होते. मृणाल गायकवाड म्हणाल्या की, धुळे शहर नावीन्यपूर्ण असून शहरातील प्रत्येक नागरिकाने टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू तयार केल्या पाहिजे.
नागरिकांनी घंटागाडीमध्ये ओला व सुका कचरा विलग करून दिला पाहिजे असेही ते म्हणाले. डॉ. राजेंद्र निकम म्हणाले की, धुळे शहराची रचना सर िवश्वेश्वरय्या यांनी केली आहे. प्रत्येक नागरिकाने शहर सुंदर कसे राहील याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.आयुक्त देविदास टेकाळे म्हणाले की, प्रत्येक नागरिकाने घंटागाडीमध्ये ओला व सुका कचरा वर्गीकरण करून देणे आवश्यक आहे.
तसेच गेल्या वर्षी स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियानात चांगले काम केल्यामुळे मनपाला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. प्लास्टिकचा वापर करू नये. कचरा हा घंटागाडीत द्यावा असे आवाहन त्यांनी केले. यशस्वितेसाठी सुप्रिया निकम, रोहित हिवरकर, महेंद्र प्रकाश ठाकरे आदींनी प्रयत्न केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.