आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महात्मा फुले:महात्मा फुले स्मारकाचे सुशोभिकरण करा; नियमित स्वच्छता करून पावित्र्यही जपावे

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्टेशन रोडवरील महात्मा फुले यांच्या स्मारकाचे सुशोभिकरण करून या ठिकाणी असलेल्या जिन्याची उंची वाढवावी, स्मारकाची स्वच्छता करावी, अशी मागणी लोक क्रांती सेनेने केली आहे. याविषयी महापालिकेच्या आयुक्तांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, शहरातील स्टेशन रोडवर महात्मा फुले यांचे स्मारक आहे. स्मारकाच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या जिन्याची उंची कमी असल्याने माल्यार्पण करताना कसरत करावी लागते. त्यामुळे जिन्याची उंची वाढवावी. स्मारकाची महापालिकेतर्फे स्वच्छता होत नाही. फक्त जयंती आणि पुण्यतिथीच्या दिवशी स्मारक स्वच्छ केले जाते. स्मारकाच्या सुरक्षिततेसाठी असलेल्या कंपाऊंडची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे स्मारकाचे विस्तारीकरण करून लवकरात लवकर कंपाऊंड करण्यात यावे, मागण्या मंजूर झाल्या नाही तर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा लोक क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष देवेंद्र पाटील, उपनेते बी. एन. बिरारी, मनपा शिक्षण मंडळाचे माजी सदस्य सुनील बिरारी, लोक क्रांती वकील सेनेचे प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. ज्ञानेश्वर महाजन, प्रदेश कायदेशीर सल्लागार अ‍ॅड. चंद्रकांत येशीराव, लोक क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष आसाराम माळी, लोक क्रांती युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष पवन देवरे, ईश्वर बारी, लोटन माळी आदींनी दिला आहे. याविषयी तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...