आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेट स्पर्धा:धुळे संघाने बीड; साताऱ्याला नमवले

धुळे20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराजवळील कुंडाणे येथील महाराष्ट्र क्रिकेट असाेसिएशनच्या मैदानावर १९ वर्षांखालील महिलांच्या आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत धुळे जिल्हा महिला क्रिकेट संघाने बीड संघाचा दहा तर सातारा संघाचा सात गडी राखून पराभव केला. स्पर्धेतील पहिला सामना धुळे व बीड जिल्हा संघात झाला. धुळे संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करत बीड संघाला ५७ धावात गारद केले. धुळे संघातर्फे कविता कुवरने ४ षटकांत ५ धावा देत ३ गडी बाद केले. कृष्णाली साळुंखेने २ तर ज्ञानदा निकम हिने २ गडी बाद केले.

विजयासाठी आवश्यक असलेल्या ५८ धावांचा पाठलाग करताना ज्ञानदा निकमने ३३ चेंडूत २९ धावा तर मीनल पाटीलने ३० चेंडूत १३ धावा करत धुळे जिल्हा संघाला १० गड्यांनी विजय मिळवून दिला. दुसरा सामना धुळे व सातारा संघात झाला. या सामन्यात धुळे संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करत सातारा संघाला ६४ धावात रोखले. संघातर्फे कृष्णाली साळुंखेने ४ षटकांत १३ धावा देत २ गडी बाद घेतले. ज्ञानदा निकमने १ तर कविता कुवरने १ गडी बाद केला. विजयासाठी आवश्यक असलेल्या ६५ धावांचा पाठलाग करताना ज्ञानदा निकमने ३५ चेंडूत ३३ तर कविता कुवर १७ चेंडू मध्ये ११ धावा करत संघाला ७ गडी राखून विजय मिळवून दिला. कैलास पाटील, अनिल वाडेकर व विजय अग्रवाल यांनी पंच म्हणून तर दीपक जगताप यांनी काम बघितले.

बातम्या आणखी आहेत...