आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधुळे तालुक्यातील ३३ पैकी ६ ग्रामपंचायतीत थेट सरपंचाची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यात बेहेड, चांदे, मांडळ, मेहेरगाव व नावरा ग्रामपंचायतीत सरपंच निवड बिनविरोध झाली आहे. तर विविध ग्रामपंचायतीच्या ८२ जागांवर सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यातील १२८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका हाेत आहे. त्यात धुळे तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. माघारीच्या शेवटच्या दिवशी अनेकांनी माघार घेतली. त्यात बेहेड ग्रामपंचायतीत सलग चार वेळा भाजपचे जयसिंग चतुरसिंग गिरासे उर्फे रावसाहेब गिरासे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक बिनविराेध झाली.
त्यात लाेकनियुक्त सरपंच म्हणून जयसिंग गिरासे हे स्वत: बिनविराेध झाले. ते सध्या बाजार समितीचे प्रशासक म्हणूनही काम पाहत आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डी.आर.चाैधरी यांनी काम पाहिले. याशिवाय नावरा ग्रामपंचायतीतही सरपंच व सदस्यांची बिनविराेध निवड करण्यात आली आहे. तसेच छाननीत चांदे सरपंच बिनविराेध झाले हाेते. मांडळचेही सरपंच पदासाठी आलेल्या अर्जापैकी तीन अर्ज अवैध ठरले हातेे.
तर आज एका उमेदवाराने माघार गेतल्याने नयना संदीप पाटील यांची बिनविराेध सरपंचपदी निवड झाली. दरम्यान, बेहेड ग्रामपंचायतीची निवडणुक बिनविराेध झाली आहे. त्या भाजपचे जयसिंग गिरासे यांच्या नेतृत्वाखाली चाैथ्यांना सत्ता मिळवली. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाने प्रथम बिनविराेधने खाते उघडले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.