आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:योजनांचा लाभ घेणाऱ्यांनी हयातीचे दाखले त्वरित द्यावे

धुळे24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या माध्यमातून सामाजिक अर्थसहाय्याच्या योजना राबवण्यात येतात. या योजनांचा लाभ घेणाऱ्यांनी ३० सप्टेंबरपर्यंत हयातीचा दाखला, आधार कार्ड व बँक बचत खात्याच्या पुस्तकाची छायांकित प्रत जमा करावी, असे आवाहन संजय गांधी योजनेचे तहसीलदार मुकेश कांबळे यांनी केले आहे.

सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या माध्यमातून संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तिवेतन योजनेतून अर्थसाहाय्य दिले जाते. शासन निर्णयान्वये जे लाभार्थी या योजनांचा लाभ घेत असतील त्यांनी दरवर्षी डिसेंबर व मार्च अखेर हयातीचे दाखले कार्यालयात जमा करणे आवश्यक असते. ज्या लाभार्थ्यांनी हयातीचे दाखले जमा केले नसतील त्यांनी ३० सप्टेंबरअखेर ते जमा करावे. जे लाभार्थी हयातीचे दाखले सादर करणार नाही त्यांना या योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे. तसेच ज्या लाभार्थ्यांनी डिसेंबर २०२१ ते जून २०२२ या कालावधीत हयातीचे दाखल जमा केले असतील त्यांनी या वर्षासाठीचे हयातीचे दाखल पुन्हा जमा करू नये.

बातम्या आणखी आहेत...