आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तीर्ण:विद्यार्थी केंद्रीत धोरणाने फायदा; पेपर लिहिण्यासाठी वाढीव वेळ, सवलतीच्या गुणांनी विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण जादा

धुळे11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दहावीची परीक्षा विद्यार्थी केंद्रीत होती. कोरोना संकटातून बाहेर आलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुळ प्रवाहात आणण्यासाठी यंदा परीक्षा पध्दतीत बदल झाला. सर्व घटकांनी केलेल्या प्रयत्नामुळे दहावीचा निकाल चांगला लागला. पेपर लिहिण्यासाठी दिलेला वाढीव वेळ, सवलतीच्या गुणांमुळे विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण वाढल्याचे पिंपळादेवी विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. व्ही. पाटील यांनी व्यक्त केले.

दहावीच्या निकालाचे विश्लेषण करताना आर. व्ही. पाटील यांनी सांगितले की, जिल्ह्याचा निकाल मागील वर्षाच्या तुलनेत कमी असला तरी प्रत्यक्षात २०२० च्या तुलनेत अधिक आहे. विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी विविध उपाययोजना झाल्या. त्याचा मुलांना फायदा झाला. विद्यार्थ्यांचा लिखाणाचा वेग कमी झाला होता.

त्यामुळे मंडळाने वेळ वाढवून दिली. तसेच २५ टक्के अभ्यासक्रम कमी केला. ४० टक्के प्रॅक्टीकल देण्यात आले. प्रत्येक शाळेत परिक्षेचे उपकेंद्र असल्याने विद्यार्थ्यांवर असलेला ताण कमी झाला. विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी त्यांना चित्रकला, क्रीडा, स्काऊटचे सवलत गुण देण्यात आले. त्यामुळे निकाल चांगला लागला. शिक्षकांनी केलेले समुपदेशन फायदेशीर ठरले. एक किंवा दोन विषय नापास झालेल्या विद्यार्थ्यांना एटीकेटीच्या बेसवर पुढील शैक्षणिक वर्षात प्रवेश मिळेल. त्यामुळे निराश होऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

वेळेत वेळापत्रक जाहीर करण्यामुळे ताण कमी होण्यास मदत
प्रत्येक शाळेत परीक्षा केंद्र व प्रत्येक पेपरनंतर एक दिवस सुट्टी असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यास वेळ मिळाला. परीक्षेचे वेळापत्रक डिसेंबर महिन्यातच जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांना तयारी करण्यास पुरेसा वेळ मिळाला. विद्यार्थ्यांना उभारी देण्यासह त्यांच्यात सकारात्मक भावना वाढीस लागण्यासाठी समुपदेशकांची नियुक्ती केली. तसेच हेल्पलाईन नंबर सुरु केल्याने त्याचा फायदा झाला. यंदा दरवर्षाच्या तुलनेत पंधरा दिवस उशीरा परीक्षा झाल्या.

एकुण अभ्यासक्रमापैकी २५ टक्के अभ्यासक्रम कमी केल्याने अभ्यासाचा ताण कमी झाला. लेखी परीक्षेपूर्वी व नंतर प्रात्यक्षिक, तोंडी, श्रेणी व मुल्यमापन परीक्षा घेण्यात आल्याने तणाव कमी झाला. तसेच ७० ते १०० गुणांसाठी ३० मिनीट तर ४० ते ४० गुणांच्या पेपरसाठी १५ मिनिटांचा वाढीव वेळ मिळाल्याने लेखी परिक्षेत विद्यार्थ्यांना वेळेचे व्यवस्थापन करता आले. त्यामुळे उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण वाढले. विद्यार्थ्यांच्या मनावर कोरोनाचा ताण होता. त्यानंतरही त्यांनी हा ताण झुगारून परीक्षा दिल्याचे आता निकाल लागल्यानंतर स्पष्ट झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...