आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठक‎:झेडपीत आश्वासित‎ प्रगती योजनेचा लाभ‎

धुळे‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषदेचे कर्मचारी अनेक‎ वर्षांपासून आश्वासित प्रगती‎ योजनेच्या लाभापासून वंचित‎ होते. योजनेचा लाभ कर्मचाऱ्यांना‎ मिळावा यासाठी पाठपुरावा सुरू‎ होता. त्यानुसार आता ३९‎ कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती‎ योजना लागू करण्याचा निर्णय‎ झाला आहे.‎ जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या‎ प्रलंबित मागण्यांवर चर्चा‎ करण्यासाठी गेल्या महिन्यात‎ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी‎ अधिकारी बुवनेश्वरी एस यांच्या‎ दालनात जिल्हा परिषद कर्मचारी‎ युनियनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक‎ झाली होती.

बैठकीत आश्वासित‎ प्रगती योजनेचा लाभ देण्याचे‎ आश्वासन मुख्य कार्यकारी‎ अधिकारी बुवनेश्वरी एस दिले‎ होते. त्यानुसार विस्तार अधिकारी,‎ वरिष्ठ सहायक, कनिष्ठ सहायक,‎ परिचर, वाहन चालक आदी‎ विविध संवर्गातील ३९‎ कर्मचाऱ्यांना १०, १२, १४, २०, ३०‎ वर्षाचा लाभ देण्याचे आदेश मुख्य‎ कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी‎ एस यांनी दिले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...