आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासध्या कापसाच्या भावाने उच्चांक गाठला आहे. हंगामाच्या सुरुवातीपासूनच कापसाला सरासरीपेक्षा अधिकचा दर मिळाला. दरवर्षी हंगामाच्या शेवटी कापसाच्या दरात घसरण होते. यंदा मात्र, वाढीव दर कायम राहिले आहेत. हंगामाच्या अंतिम टप्प्यात तर कापसाला विक्रमी दर मिळत असून दिवसाकाठी दरात होत असलेली वाढ सुरूच आहे.
मध्य प्रदेशातील खेतिया येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत ही सर्व विक्रम मोडीत काढत आहेत. या बाजार समितीत कापसाला सोन्याप्रमाणे दर मिळत आहे. मंगळवारी भालेर (ता.जि.नंदुरबार) येथील शेतकरी विनायक टोंगल यांच्या कापसाला ११७०५ रुपये एवढा विक्रमी दर मिळाला.
गेल्या काही दिवसांपासून कापसाला दहा ते अकरा हजारांचा भाव मिळत होता. आता आवक कमी होताच पुन्हा दरात वाढ झाली आहे. मध्य प्रदेशातील खेतिया येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे गेल्या काही दिवसांपासून दिवसाला ३०० ते ४०० रुपयांची वाढ होत आहे. हंगामात हे प्रथमच घडत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. एकीकडे कापसाला चांगला भाव मिळत असला तरी सध्या शेतशिवारामध्ये कापूस राहिलेला नाही. मात्र, ज्या शेतकरी व व्यापाऱ्यांनी कापसाची साठवणूक केली आहे. त्यांना फायदा होत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.