आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:मुलांना व्यवहार ज्ञानाचे धडे‎ देण्यासाठी भरवला बाजार‎

धुळे‎24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील श्री शिवाजी विद्या‎ प्रसारक संस्थेच्या कला, वाणिज्य‎ महाविद्यालयात खान्देश बाजार‎ उपक्रम राबवण्यात आला.‎ विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञानाचे धडे‎ मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम‎ राबवण्यात आला.‎ केंद्र सरकारच्या मानव संसाधन‎ विकास मंत्रालयातंर्गत महात्मा गांधी‎ राष्ट्रीय ग्रामीण शिक्षण परिषदेच्या‎ माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये‎ व्यावसायिक शिक्षण रुजवण्याच्या‎ उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात‎ आला. महाविद्यालयातील वाणिज्य,‎ अर्थशास्त्र आणि आयक्यूएसी‎ विभागाने या उपक्रमाचे नियोजन‎ केले.

या उपक्रमातंर्गत‎ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी‎ विविध खाद्य पदार्थांसह इतर‎ वस्तूंची २१ दुकान थाटली होती.‎ उद्योजक विशाल देवरे यांच्या हस्ते‎ या उपक्रमाचे उद्घाटन झाले. डॉ.‎ मनीषा कचवे आणि डॉ. सदाशिव‎ सूर्यवंशी यांनी परिक्षण केले. प्राचार्य‎ डॉ. मनोहर पाटील यांच्या‎ मार्गदर्शनाखाली हा उपक्रम झाला.‎ या उपक्रमाला प्रा. डॉ. संजय‎ घोडसे, प्रा. डॉ. जितेंद्र तलवारे, प्रा.‎ डॉ महेंद्रकुमार वाढे, प्रा. डॉ नरेश‎ बागल, प्रा. क्रांती पाटील, प्रा. डॉ.‎ कल्पना पाटील, प्रा. डॉ. शरद‎ भामरे, प्रा. डॉ. भय्या पाटील, प्रा.‎ आनंद पवार, प्रा. डॉ. संभाजी नरुटे,‎ प्रा. डॉ. भाऊसाहेब देसले, प्रा.‎ सतीलाल कंनोर, प्रा. प्रशांत‎ वानखेडे यांचे सहकार्य लाभले.‎ विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान मिळावे‎ यासाठी हा उपक्रम झाला.‎

बातम्या आणखी आहेत...