आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील भोगवाडे बु, येथील प्राथमिक जि.प.शाळेची दुरावस्था झाली असून वर्गखोल्यांना मोठमोठे तडे गेलेले आहेत. यात भिंतीला तडे गेल्याने ती केव्हा कोसळून पडेल हे सांगणे कठीण असले तरी विद्यार्थ्यांचा जिवितांना धोका निर्माण झाला आहे. सन २००७-८ मध्ये सर्व शिक्षा अभियानांतर्गत या प्राथमिक जि.प.शाळेचे बांधकाम करण्यात आले. मात्र इमारतीचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे आजच्या स्थितीत भिती पडक्या होऊन दैन अवस्था झाली असून धोकेधायक ठरत आहे. ऐन पावसाळ्यात वर्ग खोलीत पाण्याचा बोगदाच पडत असल्याने व इमारतीला तडे जावून मोठमोठ्या भेगा पडल्या आहे. वरच्या स्लँबला मोठा भोगा पडला आहे. यात ईमारत कोसळण्याची दाट शक्याता आहे. शिवाय पावसाळ्याचे दिवस असल्याने स्लॅबसह भिंती केव्हा पडून जाईल यांचा नेम नाही. एकाद्यावेळी ही पडकी ईमारत कोसळून विद्यार्थ्यांचा जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
संबंधित विभाग याच घटनेची वाट तर बघत नाही ना, असा सवाल उपस्थित झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून गाव परिसरातील ग्रा.प.सदस्य वन्या पावरा, डेटका पावरासंह विद्यार्थी पालकांनी ग्रा.पं.सदस्य वन्या पावरा यांच्या घराची एक स्वतंत्र खोली शाळेला देण्याचे ठरवले व संबंधित मुख्यध्यापकाला सुचना देखील करण्यात आल्या की नवीन ईमारत तयार होईपर्यंत एका खाजगी घरातील स्वतंत्र खोली देण्यात येत असून आपण शाळा स्थलांतर करुन नियमित शाळा सुरु ठेवावी, असे सांगितले आले. मात्र मुख्यध्यापकाने दुर्लक्ष केले आहे.धोकेदायक इमारतीचा फायदा घेत शिक्षक हजेरी पुरते उपस्थित राहतात.अशा या शिक्षण विभाच्या हलगर्जीपणा व दुर्लक्षपणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे यात या परिसरातील जि.प.शाळेत शिक्षण घेणाऱ्या शाळेला दोन वर्ग खोल्यांची ईमारत व्हावी. या साठी सन २०१५ पासून सतत पाठपुरावे येथील स्थानिक लोकप्रतिनिधी व विद्यार्थी पालक करीत आहेत. परंतु जाणूनबूजून दुर्लक्ष केले जात आहे, अशी तक्रार करण्यात येत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.