आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूमिपूजन:राजविहीर परिसरात विविध कामांचे आमदार पाडवी यांच्या हस्ते भूमिपूजन

बोरदएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राजविहीर परिसरात विविध विकास कामांचे रविवारी शहादा-तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत भाजप कार्यकर्ते व अनेक ज्येष्ठ सदस्य उपस्थित होते.

गेल्या अनेक वर्षांपासून राजविहीर परिसरातील राजविहीर ते रेवानगर रस्त्यावर असलेल्या नदीवर पुलाचे बांधकाम तसेच राजविहीर ते बेलीपाडा रस्त्यावर असलेल्या नदीवरील पुलाच्या बांधकामाचीही मागणी ग्रामस्थांच्या वतीने केली जात होती; परंतु याबाबत कुठल्याही लोकप्रतिनिधीने आजपर्यंत लक्ष दिले नव्हते; परंतु आमदार पाडवी हे तालुक्यातील विकासाला प्राधान्य देत असल्याने त्यांच्याकडे राजविहीर येथील भाजपचे ज्येष्ठ सदस्य सतीश वळवी यांनी वेळोवेळी या दाेन्ही पुलांच्या बांधकामाची मागणी लावून धरली होती. या मागणीची दखल घेत आमदार पाडवींनी आदिवासी विकास विभागांतर्गत अर्थसंकल्प २०२२-२३ अंतर्गत राजविहीर ते रेवानगर रस्त्यावर असलेल्या नदीवर पूल बांधकामासाठी ६५ लाख तर राजविहीर ते बेलीपाडा रस्त्यावरील पुलासाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

दरम्यान राजविहीर येथे गावांतर्गतच रस्ता काँक्रिटीकरण तसेच बुधावली येथे रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामाचे उद्घाटन रविवारी आमदार पाडवींच्या हस्ते झाले. यावेळी सतीश वळवी, माजी सभापती आकाश वळवी, शानू वळवी व ग्रामस्थ उपस्थित हाेते.

बातम्या आणखी आहेत...