आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील चितोड रोड परिसरातील कैलास नगर वसाहतीत महादेव मंंदिर साकारले जाणार आहे. या मंदिराच्या भूमिपूजनाचा मान येथील रहिवाशांनी तीन तृतीयपंथींना दिला. कैलास नगरात लवकरच लोकसहभागातून महादेव मंदिर साकारले जाणार आहे. या महादेव मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. भूमिपूजनाचा मान किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर रवी जोगी यांचे शिष्य स्वरा जोगी, शुभांगी जोगी, जान्हवी जोगी या तिघा तृतीयपंथींना देण्यात आला.
या वेळी कैलास नगरचे रहिवासी पत्रकार मनोज गर्दे, अमृत भारती, राजेंद्र छोटीसिंह परदेशी, सुखदेव निगम, राजेश सोनार, संजय भावसार, संजय माळी, कैलास माळी, विकास मोरे, प्रकाश झनके, अनिल हटकर, कैलाश पाचंगे, चेतन गर्दे, घनश्याम महाजन, राधे महाजन, समाधान पाकळे, रोहित परदेशी, अभिजित परदेशी, जयेश निकम, विवेक वाडिले, सक्षम वाडिले, तेजस बागले, रोहित गर्दे, प्रफुल्ल सोनार, सिद्धू सोनवणे, मयूर जाधव, हिमेश गर्दे, पवन माने, लकी उघडे आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.