आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीच्या चेअरमनपदी भूपेश रसिकलाल पटेल यांची तर व्हाइस चेअरमनपदी प्रभाकरराव तुकाराम चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली.
सूतगिरणीच्या १७ जागांसाठी आमदार अमरीश पटेल, आमदार काशिराम पावरा यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक बिनविरोध झाली होती. त्यानंतर शनिवारी निवडणूक निर्णय अधिकारी मनोज चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली चेअरमन व व्हाइस चेअरमन निवडीची प्रक्रिया पार पाडली. चेअरमन पदासाठी भूपेश रसिकलाल पटेल यांचा एकमेव अर्ज दाखल झाला.
त्यांच्या अर्जावर सूचक जनार्दन तानाजी पाटील व अनुमोदक रंजना रवींद्र गुजर होते. तसेच व्हाइस चेअरमन पदासाठी प्रभाकर तुकाराम चव्हाण यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यांच्या अर्जावर सूचक जगतसिंग आनंदसिंग राजपूत व अनुमोदक सुदाम नथू भलकार होते. दोघांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक प्रक्रियेसाठी अमोल एंडाईत, रवींद्र चौधरी यांनी सहकार्य केले. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार झाला. या वेळी संचालक गोपाल भंडारी, जनार्दन पाटील, संग्रामसिंग राजपूत, नामदेव चौधरी, रमेश कोळी, जगतसिंग राजपूत, भरत पाटील, आशिष चौधरी, संदीप देवरे, अजितकुमार शाह, वासुदेव देवराम पटले उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.