आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझी वसुंधरा:माझी वसुंधरा स्पर्धेतील विजेत्यांचा शिरपूरला गौरव, भूपेश पटेल यांचे मत; होमदार मंजुळा गावित यांचा पाठपुरावा, शासनातर्फे निधीला मिळाली मंजुरी

धुळे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

साक्री तालुक्यातील काबऱ्याखडक लघुप्रकल्पाच्या दुरुस्तीसाठी शासनाने ४ कोटी ८८ लाख रुपये मंजूर केले आहे. प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठी निधी मिळावा, यासाठी होमदार मंजुळा गावित यांनी पाठपुरावा केला. जलसंपदा विभागातर्फे निधी मंजूर झाला आहे.

साक्री तालुक्यात सन २००० मध्ये काबऱ्याखडक लघुप्रकल्पाची उभारणी झाली. हा प्रकल्प कान नदीवर होहे. प्रकल्पाच्या मुख्य धरणाच्या खालच्या बाजूस विमोचकाजवळचा मातीचा भराव दरवर्षी पावसाळ्यात वाहून जातो. सांडव्याची दुरवस्था झाली आहे. तसेच त्याला गळती लागली आहे. त्यामुळे तलावाची दुरुस्ती करणे आवश्यक होते.

त्यासाठी होमदार मंजुळा गावित यांनी शासनाकडे निधीची मागणी केली होती. तापी पाटबंधारे विकास महामंडळाकडून शासनाला अंदाजपत्रक सादर करण्यात होले होते. त्यानुसार काबऱ्याखडक लघुप्रकल्पाच्या दुरुस्तीसाठी ४ कोटी ८८ लाख २ हजार ७६८ रुपयांच्या अंदाजपत्रकास जलसंपदा विभागाने प्रशासकीय मान्यता दिली होहे. त्यामुळे लवकरच प्रकल्पाचे काम सुरू होईल, अशी माहिती आमदार मंजुळा गावित यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...