आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशमूर्ती:विद्यार्थ्यांनी घडवल्या बीजांकुर गणेशमूर्ती

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे तालुक्यातील तरवाडे येथील जवाहर शिक्षण प्रसारक संस्थेच्या माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शेतातील मातीपासून गणेशमूर्ती तयार केल्या. मूर्ती तयार करताना विद्यार्थ्यांनी मूर्तीत फळे, फुलांच्या बिया ठेवल्या. मूर्तीचे विसर्जन केल्यावर कुंडीत रोप उगवेल.

विद्यार्थ्यांनी कलाशिक्षक आर. बी. कासार यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशमूर्ती तयार केल्या. मूर्तीला कुंकू, गुलाल, हळद, निळ, कोळसा, अष्टगंधाचा वापर करून रंग दिला. मूर्ती करताना त्यात सीताफळ, रामफळ, पपई, गुलबक्षी, झेंडू, गोकर्ण अादींच्या बिया ठेवल्या. मूर्तीचे विसर्जन करण्यात केल्यावर कुंडीत रोप उगवेल. कार्यशाळेत पाचवी ते दहावीचे विद्यार्थी सहभागी हाेते.

बातम्या आणखी आहेत...